Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL च्या इतिहासात लिलावात विकला गेलेला पहिला खेळाडू कोण? ज्याचा झाला होता कमी वयात अनपेक्षित मृत्यू

IPL Auction: आयपीएलचा फिव्हर जोर धरत आहे, आज आणि उद्या लिलाव होत आहे, अशा स्थितीत आयपीएलशी निगडीत महत्वाच्या गोष्टींची सध्या चर्चा होत आहे. आयपीएल इतिहासात डोकावल्यास जुन्या गोष्टींबद्दल माहिती घेणे चाहत्यांना महत्वाचे वाटते, त्यात काही गंभीर तर काही रंजक बाबी समजतात.

यातच 2008 साली सुरू झालेला हा आयपीएल कार्यक्रम काळाबरोबर वाढतच गेला. संघही वाढले आणि खेळाडूही वाढले. याशिवाय पैशांचा पाऊसही वाढतच गेला. आयपीएल ही जगातील लोकप्रिय लीगपैकी एक आहे. 2008 साली आयपीएलची सुरुवात झाली आणि ती स्पर्धा मुंबईत झाली. त्या काळात जागतिक क्रिकेटमधील अनेक दिग्गजांच्या बोली लागल्या होत्या.

IPL Auction

स्टार क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीही याच आयपीएलमधील लिलावाचा भाग होता. धोनी लिलावात असला तरी त्यादरम्यान विकला जाणारा पहिला खेळाडू दुसरा कोणीतरी होता. क्रिकेटप्रेमींसाठी दुःखाची गोष्ट म्हणजे आयपीएल लिलावाच्या इतिहासात पहिल्यांदा विकला जाणारा खेळाडू आता या जगात नाही.

हेही वाचा : आयपीएल 2025 मेगा लिलावाची वेळ काय आहे? किती खेळाडूंचा लिलाव होणार? कोणत्या संघाकडे किती पैसे? वाचा

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू शेन वॉर्नला सर्वात आधी विकले गेले. आयपीएलबद्दल जेव्हा पहिल्यांदा उल्लेख केला जातो तेव्हा वॉर्नचे नाव नक्कीच येते. 2022 मध्ये त्यांचे निधन झाले. त्यावेळी ते थायलंडमध्ये होते आणि वयाच्या 52 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी हे जग सोडले. त्यावेळी शेन वॉर्नला राजस्थान रॉयल्सने 4 लाख 50 हजार अमेरिकन डॉलर्समध्ये खरेदी केले होते. त्या वेळेनुसार ही रक्कम 1 कोटी 80 लाख रुपये येते.

हेही वाचा : IPL Action 2025: मार्की खेळाडू कोणाला म्हणतात? खरेदीसाठी संघांमध्ये युद्ध होईल! करोडोंचा पडेल पाऊस !

आजपर्यंत, शेन वॉर्नचा राजस्थान रॉयल्सने अंदाजे 3 कोटी 80 लाख रुपयांच्या बोलीमध्ये समावेश केला होता. विशेष म्हणजे शेन वॉर्नचा समावेश करण्यासोबतच राजस्थान रॉयल्सनेही संघाचे कर्णधारपद सोपवले होते. वॉर्न हा या संघाचा पहिला कर्णधार होता आणि त्याच मोसमात राजस्थान रॉयल्सने विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर आतापर्यंत राजस्थान रॉयल्सला आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवता आलेले नाही

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+