Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL Action 2025: मार्की खेळाडू कोणाला म्हणतात? खरेदीसाठी संघांमध्ये युद्ध होईल! करोडोंचा पडेल पाऊस !

IPL 2025 Auction marquee sets : IPL मेगा लिलाव 2025 साठी मार्की खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. लिलावात आकर्षणाचे केंद्र असलेले हे खेळाडू असतात. या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी आयपीएल संघांमध्ये चुरशीची स्पर्धा सुरू आहे. त्यांच्या खासियत, फॉर्म आणि क्रिकेट जगतात त्यांची ओळख यामुळे अनेकदा चर्चेत असतात.

मार्की खेळाडू कोण आहेत?

मार्की खेळाडू हे असे खेळाडू आहेत ज्यांना लिलावापूर्वी विशेष लक्ष दिले जाते. खेळाडूंची क्षमता, प्रतिष्ठा आणि मागील कामगिरीच्या आधारावर त्यांची निवड केली जाते. मार्की खेळाडूंची एक विशेष यादी तयार केली जाते, ज्यामुळे हे खेळाडू लिलावात जास्त किंमतीला विकले जात आहेत. या खेळाडूंमध्ये एक विशेष आकर्षण आहे.

IPL 2025

मार्की खेळाडू मेगा लिलावासाठी आहेत तयार

2025 च्या मेगा लिलावासाठी दोन गट तयार करण्यात आले असून त्यात एकूण 12 खेळाडूंचा समावेश आहे. काही मोठी नावे आणि स्टार खेळाडू असतील ज्यांच्यासाठी वेगवेगळे संघ बोली लावू शकतात. हे खेळाडू सहसा परदेशी आणि देशांतर्गत असतात, ज्यांच्याकडे उत्कृष्ट फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण क्षमता असते. या खेळाडूंना आपल्या संघात समाविष्ट करण्यासाठी संघ मोठ्या प्रमाणात बोली लावतात. कारण संघ मजबूत करण्यासोबतच हे खेळाडू आयपीएलच्या प्रेक्षकांनाही आकर्षित करतात.

IPL 2025 च्या मार्की खेळाडूंच्या यादीतील
सेट-1 आणि सेट-2 मधील खेळाडूंची यादी खालीलप्रमाणे-

सेट-1:

जॉस बटलर
श्रेयस अय्यर
ऋषभ पंत
कागिसो रबाडा
अर्शदीप सिंग
मिचेल स्टार्क

सेट-2 :

युझवेंद्र चहल
लियाम लिव्हिंगस्टोन
डेव्हिड मिलर
केएल राहुल
मोहम्मद शमी
मोहम्मद सिराज

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+