अमित शहांना 24 तासांत दुसरी गुड न्यूज, मुलगा जय शहांना पुत्ररत्न प्राप्त, गृहमंत्री बनले आजोबा
Jay Shah blessed with a Baby boy : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला आणि भाजपने आश्चर्यकारक कामगिरी केली. यानंतर संपूर्ण भाजपच्या गोटात आनंदाची लाट उसळली आहे.
या विजयाबद्दल देशाच्या गृहमंत्र्यांनी महाराष्ट्रातील जनतेचे मनापासून आभार मानले आहेत. या विजयामागे शहा यांची रणनीती महत्त्वाची मानली जात आहे. अशातच अमित शहांना दुसरी आनंदाची बातमी मिळाली आहे. त्यांचे पुत्र व बीसीसीआयचे सचिव जय शहा यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. त्यामुळे एकाचवेळी केंद्रीय गृहमंत्र्यांचा डबल गुड न्यूज मिळाल आहे.

बीसीसीआय सचिव जय शहा यांना पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. सद्या सौदी अरेबियामध्ये सुरू असलेल्या आयपीएल 2025 मेगा लिलावादरम्यान रविवार, 24 नोव्हेंबर आयपीएलचे अध्यक्ष अरुण धुमल यांनी जय शहा यांचे पुन्हा बाबा झाल्याबद्दल अभिनंदन केले. धूमल म्हणाले की, जय शाह हे भारताच्या मैदानाबाहेरचा कर्णधार आहे. पुन्हा बाबा झाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करतो.
भारताचा मैदानी कर्णधार रोहित शर्मा देखील बाबा झाला आहे. ज्यामुळे त्याला पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आपल्या संघाच्या पहिल्या कसोटी सामन्याला मुकावे लागले होते. रोहितच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. दुसरीकडे, आयपीएलचा मेगा लिलाव आजपासून सुरू झाला असून तो दोन दिवस चालणार आहे. आज पहिल्या दिवशी सर्व मार्की खेळाडूंची विक्री झालेली आहे.












Click it and Unblock the Notifications