IPL 2025 postponed : स्थगित झालेले आयपीएल सामने पुन्हा कधी सुरु होणार? गुणतालिकेत कोण नंबर वन? वाचा
IPL 205 postponed When will matches be held again : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष आणि पाकिस्तानकडून 8 मे 2025 रोजी झालेल्या ड्रोनहल्ल्यादरम्यान, पंजाब किंग्ज 11 आणि दिल्ली कॅपिटल यांच्यातील आयपीएल सामना रद्द करण्यात आला. यानंतर आता आयपीएल क्रिकेट स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.
भारत पाकिस्तान संघर्षाच्या पार्श्वभुमीवर आयपीएलमध्ये खेळणाऱ्या परदेशी खेळाडू तणावात होते, त्यांनी आपल्या देशात जाण्याची मागणी केल्याचे वृत्त एनडीटीव्हीने दिले आहे. त्यानंतर संघर्षही वाढत असल्याची खबरदारी पाहता आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने घेतला आहे. या निर्णयानंतर आता पुन्हा आयपीएल सामने कधी होणार, कोठे होणार आणि सध्या गुणतालिकेत कोणता संघ कोणत्या स्थानावर हे आपण जाणून घेऊया.

आयपीएलचे 16 सामने राहीले..
आयपीएल स्पर्धाच अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.त्यामुळे आयपीएलचे नियोजित सामने होणार नाहीत. आयपीएल सुरु झाल्यापासून काल 8 मेपर्यंत 58 सामने पार पडले आहेत. सध्या या स्पर्धेतील 16 सामने खेळणे बाकी आहे, साखळी स्पर्धेत प्रत्येक संघाला तेरा सामने खेळायचे असून बहुतांश संघांचे 10 ते 12 सामने पुर्ण झाले आहेत. प्लेऑफमध्ये अंतीम 4 संघात चुरस असताना हा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.
काल अर्धवट अवस्थेत रद्द करण्यात आलेला आयपीएलचा 58 वा सामना होता, त्यानंतर दोन सेमीफायनलचे सामने आणि एक अंतीम सामना 25 मे रोजी आयोजित केला होता पण आता उर्वरित सोळा सामने कधी होतील याची माहिती क्रिडा रसिक जाणून घेत आहे.
पुन्हा कधी होऊ शकतात आयपीएलचे सामने?
आयपीएल सिरीजनंतर भारतीय संघ इंग्लड दोऱ्यावर जाणार आहे. रिपोर्टनुसार भारतीय संघ इंग्लड दौऱ्यावरुन परत आल्यानंतर पुन्हा आयपीएलचे उर्वरित सामने खेळले जाऊ शकतात. आम्ही सांगतो की, टीम इंडिया 1 जून 2025 ते 31 जूलै 2025 दरम्यान इंग्लंडचा दौरा करत आहे , त्यात उभय संघात 5 कसोटी सामने होणार आहेत.
आयपीएलमध्ये कोणता संघ कितव्या स्थानावर आहे?
आयपीएल क्रिकेट स्पर्धा काही काळासाठी रद्द झाल्यानंतर 58 वा सामनाही रद्द झाला होता, त्यामुळे आता कोणता संघ कितव्या स्थानावर आहे हे जाणून घेऊया.
- गुजरातचा संघ 11 सामने खेळून 16 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे.
- आरसीबी संघानेही तितकेच (11) सामने खेळून 16 गुण कमावले आहे. पण नेट रनरेट गुजरातपेक्षा कमी असल्याने हा संघ दुसऱ्या स्थानावर आहे.
- तिसऱ्या स्थानावर पंजाब किंग्ज हा संघ असून त्याने 12 सामने खेळून 16 गुण कमावले आहे. या संघाचा कालचा सामना रद्द झाला आहे.
- मुंबई इंडियन्स संघ 12 सामन्यात 14 गुण मिळवत चौथ्या स्थानी आहे.
- दिल्लीचा पंजाबसमवेतचा कालचा सामना रद्द झाला असून या संघाने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत या संघाचे 14 गुण झाले आहेत.
- कोलकाता नाईट रायडर 12 सामन्यात 11 गुण मिळवून सहाव्या स्थानावर आहे.
- लखनऊ संघ 11 सामने खेळून 10 गुणांसह सातव्या स्थानावर आहे.
- हैदराबादचा संघ 11 सामने खेळून 7 गुणांसह आठव्या स्थानी आहे.
- राजस्थान राॅयल संघ 12 सामने खेळून 6 गुणांसह नवव्या स्थानी आहे.
- चेन्नई सूपरकिंग्जचा संघ 12 सामने खेळून 6 गुण मिळवत दहाव्या स्थानावर आहे.












Click it and Unblock the Notifications