IPL 2026 आयपीएल लिलावाचा थरार 'या' दिग्गज खेळाडूंना बाहेरचा रस्ता; कोणत्या टीमकडे किती पैसा? वाचा
IPL 2026 Released Players List : IPL 2026 च्या मिनी ऑक्शनपूर्वी (Mini Auction) सर्व १० फ्रँचायझींनी आपल्या खेळाडूंची रिटेन्शन लिस्ट (Retention List) जाहीर केली आहे, ज्यामुळे क्रिकेट जगतात मोठी खळबळ माजली आहे. काही मोठे आणि अनपेक्षित निर्णय यावेळी पाहायला मिळाले आहेत.
आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, आणि रवींद्र जडेजा यांसारख्या स्टार खेळाडूंनाही त्यांच्या संघांनी रिलीज केले आहे, ज्यामुळे आगामी लिलावात अनेक खेळाडूंचे भविष्य पणाला लागणार आहे. सर्वात जास्त पैसा घेऊन KKR ऑक्शनमध्ये उतरणार आहे, तर मुंबई इंडियन्सची अवस्था बिकट आहे.

रिलीज झालेल्या खेळाडूंची यादी (IPL 2026)
कोलकाता नाईट रायडर्स (KKR): आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, लवनीथ सिसोदिया, क्विंटन डी कॉक, एनरिक नॉर्ट्जे, रहमानुल्लाह गुरबाज़, मोईन अली, स्पेंसर जॉनसन, चेतन साकरिया.
चेन्नई सुपर किंग्स (CSK): राहुल त्रिपाठी, वंश बेदी, सी आंद्रे सिद्धार्थ, रचिन रवीन्द्र, डेवोन कॉनवे, सैम करन (ट्रेड), रवींद्र जडेजा (ट्रेड), दीपक हुड्डा, विजय शंकर, शेख रशीद, कमलेश नागरकोटी आणि मथीशा पथिराना.
दिल्ली कॅपिटल्स (DC): फाफ डू प्लेसी, जेक फ्रेज़र-मैगर्क, डोनोवन फरेरा (ट्रेड), सेदीकुल्लाह अतल, मानवंत कुमार, मोहित शर्मा, दर्शन नालकंडे.
राजस्थान रॉयल्स (RR): कुनाल सिंह राठौड़, नितीश राणा (ट्रेड), संजू सैमसन (ट्रेड), वनिंदु हसारंगा, माहीश तीक्ष्णा, फ़ज़लहक फारूकी, आकाश मधवाल, अशोक शर्मा, कुमार कार्तिकेय.
पंजाब किंग्स (PBKS): जोश इंग्लिस, आरोन हार्डी, ग्लेन मैक्सवेल, कुलदीप सेन, प्रवीन दुबे.
मुंबई इंडियन्स (MI): सत्यनारायण राजू, रीस टॉपली, केएल श्रीजीत, कर्ण शर्मा, अर्जुन तेंदुलकर, बेवन जैकब्स, मुजीब उर रहमान, लिजार्ड विलियम्स, विग्नेश पुथुर.
लखनऊ सुपर जायंट्स (LSG): आर्यन जुयाल, डेविड मिलर, युवराज चौधरी, राजवर्धन हैंगरगेकर, शार्दुल ठाकुर, आकाश दीप, रवि बिश्नोई, शमार जोसेफ.
गुजरात टायटन्स (GT): शेरफेन रदरफोर्ड (ट्रेड), महिपाल लोमरोड़, करीम जनत, दसुन शनाका, गेराल्ड कोएट्जी, कुवंट खेजरोलिया.
आरसीबी (RCB): स्वास्तिक चिकारा, मयंक अग्रवाल, टिम सेफर्ट, लियाम लिविंगस्टोन, मनोज भंडागे, लुंगी एंगिडी, ब्लेसिंग मुझरबानी, मोहित राठी.
सनरायझर्स हैदराबाद (SRH): अभिनव मनोहर, अथर्व तायडे सचिन बेबी, वियान मुल्डर, मोहम्मद शमी, सिमरजीत सिंह, राहुल चाहर, एडम ज़म्पा.
कोणत्या संघाच्या पर्समध्ये किती शिल्लक रक्कम (Auction Purse)
कोलकाता नाईट रायडर्स (KKR): ₹ ६४.३ कोटी (सर्वाधिक)
चेन्नई सुपर किंग्स (CSK): ₹ ४३.४ कोटी
सनरायझर्स हैदराबाद (SRH): ₹ २५.५ कोटी
लखनऊ सुपर जायंट्स (LSG): ₹ २२.९५ कोटी
दिल्ली कॅपिटल्स (DC): ₹ २१.८ कोटी
आरसीबी (RCB): ₹ १६.४ कोटी
राजस्थान रॉयल्स (RR): ₹ १६.०५ कोटी
गुजरात टायटन्स (GT): ₹ १२.९ कोटी
पंजाब किंग्स (PBKS): ₹ ११.५ कोटी
मुंबई इंडियन्स (MI): ₹ २.७५ कोटी (सर्वात कमी)












Click it and Unblock the Notifications