Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

'अरे, मेरा क्या ले रहा हैं.. उधर देख'; रोहित शर्मा कोणावर संतापला, व्हायरल व्हिडिओत दिसली मस्ती

Rohit Sharma Video Viral : IPL 2025 मध्ये मुंबई संघाची स्थिती सद्या प्रचंड कमकुवत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना 13 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध होणार आहे. पण त्याआधी, संघाचा एक मजेदार व्हिडिओ समोर आला आहे.

ज्यामध्ये रोहित शर्मा चांगलाच रागावला आहे. पण हे रागावणे देखील मजा करतानाचे असल्याचे पाहायला मिळत आहे. रोहित शर्मा संघातील इतर खेळाडूंना मैदानातून परत बोलावतानाही दिसला. त्याने कॅमेरामनचेही कान टोचले. हा व्हायरल व्हिडिओवर आता नेटकरी जोरदार प्रतिक्रिया देत आहेत.

IPL 2025

नेमकं काय घडलं?

मुंबईचा संघ पुढच्या सामन्यासाठी सराव करत असताना वादळ आले. रोहित शर्मा मैदानाबाहेर उभा राहून खेळाडूंना हाक मारताना दिसला. दरम्यान, रोहित शर्माने वादळाकडे बोट दाखवत कॅमेरामनला म्हटले, 'अरे,तू मला काय दाखवतोय, तिकडे मैदानाकडे बघ ना' रोहितचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

रोहित शर्मा आयपीएलमध्ये प्लॉप

2025 च्या आयपीएलमध्ये रोहित शर्मा त्याच्या फॉर्ममध्ये दिसत नाही. गेल्या 4 सामन्यांमध्ये हिटमन 20 चा टप्पाही गाठू शकला नाही. तथापि, याआधी 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हिटमन उत्तम लयीत दिसला होता. आता पुढच्या सामन्यात रोहित संघासाठी मोठी खेळी खेळू शकतो की नाही हे पाहावे लागेल.

आठव्या क्रमांकावर एमआय

आयपीएल 2025 च्या पॉइंट्स टेबलमध्ये मुंबईचा संघ 8 व्या क्रमांकावर आहे. संघाला 5 सामन्यांमध्ये फक्त एकच विजय मिळाला आहे. गेल्या हंगामातही हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील संघ अपयशी ठरला होता, पुन्हा एकदा मुंबईत तीच अवस्था दिसून येत आहे. चालू हंगामात, दिल्लीचा मुंबईवर वरचष्मा असल्याचे दिसून येते.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+