IPL 2025 च्या समालोचनातून इरफान पठाणला वगळले; 'हे' धक्कादायक कारण आले समोर, चर्चा वाढल्या...
इंडियन प्रिमीअर लीगचा १८ वा हंगाम आज उत्साहाच्या वातावरणात सुरु झाला. या हंगामासाठी हिंदी कमेंटेटर्सची यादी जेव्हा समोर आली, तेव्हा अनेकांना धक्का बदला. कारण हिंदी समालोचन म्हटल्यावर, जसे नवज्योतसिंग सिद्धूचे नाव समोर येते तसेच नाव आठवते ते इरफान पठाणचे. मात्र हिंदी कमेंट्री पॅनलमधून यावेळी इरफान पठाणला वगळण्यात आले आहे. आता हे नाव का वगळले, याबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहे. माय खेलच्या म्हणण्यांनुसार त्याचे नाव वगळण्यामागे एक धक्कादायक दावा करण्यात आला आहे.

इरफानला वगळले
इंडियन प्रीमियर लीगच्या १८ व्या हंगामासाठी समालोचकांची यादी जाहीर झाली. माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाणचे नाव त्यात कुठेही नव्हते. हिंदी कमेंट्री पॅनलमध्ये प्रत्येक वेळी उपस्थित असलेली इतर सर्वांना यावेळीही संधी देण्यात आली आहे. परंतु इरफानचे नाव का वगळण्यात आले? याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
काय आहे कारण?
माय खेलच्या म्हणण्यानुसार, काही भारतीय खेळाडूंविरुद्ध टिप्पणी केल्याबद्दल इरफानला संघातून काढून टाकण्यात आले आहे. माय स्पोर्ट्स वेबसाइटनुसार, अनेक खेळाडूंनी तक्रार केली होती की इरफान जाणूनबुजून त्यांच्यावर वैयक्तिक टिप्पण्या करत आहे. पठाणचा नंबर एखाद्या खेळाडूने ब्लॉक केल्याचीही अंदाज बांधला जात आहे. इतर खेळाडूंविरुद्ध इरफान पठाण असा वैयक्तिक अजेंडा तो चालवत असल्याचा अनुभव गेल्या दोन वर्षांपासून अनेक खेळाडूंना येत असल्याचा दावाही या वृत्तात करण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे आवडले नसावे, म्हणून इरफानला समालोचनातून वगळण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
यापूर्वीही अनेकांना वगळले
शिक्षा म्हणून समालोचन पॅनेलमधून वगळण्यात आलेला इरफान पठाण हा पहिला क्रिकेटपटू नाही. यापूर्वी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर आणि क्रिकेट तज्ज्ञ हर्षा भोगले यांनीही तक्रारी दाखल केल्या आहेत. २०२० मध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वी मांजरेकर यांना बीसीसीआयच्या समालोचक संघातून काढून टाकण्यात आले. तर २०१९ मध्ये हर्षा भोगले यांना सौरव गांगुलीवर वैयक्तिक टिप्पणी केल्याबद्दल शिक्षा भोगावी लागली होती.
इरफानचे युट्यूब चॅनल
आयपीएल २०२५ च्या समालोचन संघातून काढून टाकल्यानंतर, इरफान पठाणने सोशल मीडियाद्वारे त्याच्या यूट्यूब चॅनेल सुरु केले. त्याने त्याच्या शोचे नाव 'सिधी बात वीथ इरफान पठाण' असे ठेवले आहे. आपले चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंतीही त्याने चाहत्यांना केली आहे. त्याच्या चॅनलला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही काही बातम्यांमध्ये सांगितले गेले आहे.
-
पुण्यासाठी मोठी बातमी! पुणेकरांचा प्रवास होणार सुसाट; रामवाडी-वाघोली मेट्रो कामाला गती; हा आहे फायदा -
सोन्याच्या दरात मोठी घसरण! दुबईत 10 तोळे सोने भारतापेक्षा 21 हजाराने स्वस्त; मुंबई, पुण्यातही स्वस्त -
Rajya Sabha Election 2026 Result : राज्यसभेच्या 37 जागांचा निकाल; पाहा विजेत्यांची यादी -
अदानी टोटल गॅसकडून औद्योगिक ग्राहकांसाठी अतिरिक्त नैसर्गिक वायूच्या दरात कपात -
Gold silver price today : सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात मोठी घसरण; वाचा ताजे दर -
Health News : जोडीदाराला किस करणं पडू शकतं महागात! वेळीच सावध व्हा, जाणून घ्या लक्षणं आणि उपाय -
हरीश राणांना कसा दिला जाणार 'इच्छामृत्यू'? व्हेंटीलेटर हटवणे ते अखेरच्या श्वासापर्यंत काय घडतं? वाचा -
काबुल हादरले! रुग्णालयावर भीषण 'एअरस्ट्राइक'; 400 जणांचा मृत्यू, 'त्या' व्हिडिओने जग सुन्न! -
केरळमध्ये पुन्हा 'लाल वादळ' की काँग्रेसची सरशी? ओपिनियन पोलचे आकडे समोर; पाहा कोणाला मिळणार सत्ता! -
प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! महाराष्ट्रात 5 हजार पदांसाठी मेगाभरती; चंद्रकांत पाटलांची मोठी घोषणा -
Oscars 2026 Winners : ऑस्कर पुरस्कारांची घोषणा हा चित्रपट ठरला सर्वात भारी; पाहा संपूर्ण विनर लिस्ट -
आजचे राशीचक्र: कुणाचे नशीब चमकणार आणि कुणाला संघर्ष करावा लागणार? वाचा आजचे राशीभविष्य







Click it and Unblock the Notifications