IPL-2025: आयपीएलचा पहिला सामना कोणत्या संघामध्ये होणार, कधी पासून आहे IPLचा महासंग्राम?
IPL-2025 - KKR Vs RCB : इंडियन प्रीमियर लीग (IPL-2025) चा 18 वा हंगाम शनिवार, 22 मार्चपासून सुरू होत आहे. सुरुवातीचे आणि अंतिम सामने गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) च्या होम ग्राउंड ईडन गार्डन्सवर खेळले जाणार आहे.
KKR विरुद्ध RCB यांच्यात होणार पहिला सामना?
मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएलचा पहिला सामना हा केकेआर विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) शी होणार आहे. त्यामुळे हे दोन्ही संघ आता सज्ज झाले आहेत.
क्रिकबझ या वेबसाईडनुसार जर विचार केला तर, आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक 1 किंवा 2 दिवसांत प्रसिद्ध होऊ शकते. महत्त्वाच्या सामन्यांबद्दल फ्रँचायझी संघांना माहिती देण्यात आली आहे. 2024 च्या अंतिम सामन्यात कोलकाताने सनरायझर्स हैदराबाद (SRH) ला हरवून विजेतेपद जिंकले. यावेळी हैदराबादमध्ये 2 प्लेऑफ सामने खेळवले जातील.

हैदराबादही घरच्या मैदानावरुन सुरुवात करणार
17 व्या हंगामातील उपविजेता सनरायझर्स हैदराबाद देखील त्यांच्या होमग्राउंड उप्पलपासून त्यांच्या मोहिमेची सुरुवात करेल. त्यांचा सामना 23 मार्च रोजी राजस्थान रॉयल्सशी होईल, हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3.3o0 वाजता सुरू होईल. गेल्या हंगामातील क्वालिफायर-2 मध्येही दोन्ही संघ आमनेसामने आले होते. हैदराबादने सामना जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.
25 मे रोजी कोलकाता येथे अंतिम सामना
आयपीएलमध्ये, सुरुवातीचे आणि अंतिम सामने गतविजेत्या संघाच्या घरच्या मैदानावर खेळले जातात. यावेळीही दोन्ही महत्त्वाचे सामने कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहेत. अंतिम सामना २५ मे रोजी खेळवला जाईल. क्वालिफायर-२ देखील कोलकाता येथे होणार आहे. क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटर हे मागील उपविजेत्या एसआरएचच्या होम ग्राउंड हैदराबाद येथे खेळवले जातील.












Click it and Unblock the Notifications