Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL 2025: आयपीएलचे संपूर्ण वेळापत्रक कधी जाहीर होणार? तारीख आणि वेळ लिहून ठेवा

IPL 2025: आयपीएल 2025 चा 18 वा सीझन सुरू होण्यासाठी आता फक्त काही दिवस शिल्लक राहिले आहेत. या वर्षीचा आयपीएलच्या सीझनला 22 मार्चपासून सुरू होणार आहे. यासाठी प्रत्येक संघांकडून तयारी देखील केली जात आहे. यासाठी काही संघांनी त्यांचे सराव सत्रही सुरू केले आहेत. त्यात पंजाब किंग्जचा संघ सर्वात आघाडीवर आहे.

पंजाब किंग्जच्या सराव कॅम्पमध्ये युजवेंद्र चहल सरावा करताना दिसून आला. इतर संघांनीही त्यांचे काम सुरू केले आहे. या सगळ्यामध्ये चाहत्यांच्या मनात एक मोठा प्रश्न आहे की आयपीएलचे वेळापत्रक कधी येणार. यासाठी काय प्लॅन आहे?

IPL 2025

दरम्यान आजपासून महिला प्रीमियर लीग देखील सुरूवात झाली आहे. याशिवाय टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये व्यस्त राहणार आहे. या सगळ्यामध्ये आयपीएलचे वेळापत्रक हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे. बीसीसीआयने याबाबत कोणतीही ठोस माहिती दिलेली नाही.

गतविजेत्या केकेआरला त्यांच्या घरच्या मैदानावर पहिला सामना खेळण्याची संधी मिळेल. क्रिकबझच्या मते केकेआर आणि आरसीबी यांच्यातील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. आरसीबी संघ रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरेल.

रिपोर्टनुसार सनरायझर्स हैदराबाद देखील त्यांचा पहिला सामना त्यांच्या घरच्या मैदानावर राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळेल. त्यांचा पहिला सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध 23 मार्चला होईल. आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक बीसीसीआयकडून येत्या काही दिवसांत जाहीर होण्याची अपेक्षा आहे.

आयपीएल 2025 चा अंतिम सामना कधी आणि कुठे आहे?

संघांसोबत महत्त्वाच्या सामन्यांच्या तारखा शेअर केल्याची बातमी देखील समोर येत आहे. अंतिम फेरीतही परंपरा पाळली जाईल आणि ती गतविजेत्या संघाच्या घरच्या मैदानावर होईल. अंतिम सामना 25 मे रोजी कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाईल.

2025 मध्ये आयपीएल किती शहरात आयोजित केले जाईल?

राजीव शुक्ला यांनी यापूर्वी ही स्पर्धा 23 मार्चपासून होणार असल्याचे जाहीर केले होते. परंतु बोर्डाने ब्रॉडकास्टरला लक्षात ठेवून त्यात काही बदल केले आहेत. आता ही स्पर्धा 22 मार्च पासून सुरु होईल. ब्रॉडकास्टरला सामावून घेण्यासाठी बदल करण्यात आला आहे. आयपीएलचे सामने हे कोलकाता, हैदराबाद, अहमदाबाद, मुंबई, चेन्नई, बेंगळुरू, लखनऊ, मुल्लानपूर, दिल्ली, जयपूर या 10 नियमित ठिकाणी होतील. याशिवाय या सीझनमधील सामने गुवाहाटी आणि धर्मशाळा येथेही खेळवले जातील.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+