Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPl 2025 : विराट कोहली आउट होताच बॉलिवूड अभिनेत्यावर चाहते संतापले, काय आहे प्रकरण ?

IPL 2025 Virat Kohli: सध्या सगळीकडे आयपीएलचा फिव्हर दिसून येतो. क्रिकेट चाहते आपल्या टीम आणि खेळाडूंसाठी एकमेकांशी भांडताना अनेकदा आपण पाहतो. असाच एक प्रसंग सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

आयपीएल 2025 मध्ये नुकत्याच झालेल्या सामन्यात गुजरात टायटन्सचा युवा खेळाडू अर्शद खानने आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीला फक्त सात धावांवर बाद केले. यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि विराट कोहलीचे चाहते खूप संतापले बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीवर चांगलेच संतापले.

virat kohli

चाहत्यांनी गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज अर्शद खानला अर्शद वारसी समजून चांगलेच ट्रोल केलं आहे. आयपीएल 2025 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्ध गुजरातचा अर्शद खानने विराट कोहलीला स्वस्तात बाद केले. यानंतर विराटच्या चाहत्यांनी अर्शद वारसीच्या इंस्टाग्रामवर अनेक संदेश पोस्ट केले. अर्शद वारसीच्या अलीकडील इंस्टाग्राम पोस्टवर एकाने कमेंट केली, 'तू कोहलीला का बाहेर काढले' तर दुसऱ्याने लिहिले, 'मी तुला बघून घेईन'

दरम्यान या सामन्यात अर्शद खानने एक शॉर्ट बॉल टाकला आणि कोहली पुल शॉट खेळायला गेला. त्यावेळी विराट झेलबाद झाला. त्यानंतर सोशल मिडीयावर दोन्ही संघाच्या चाहत्यामध्ये सोशल चांगलेच युध्द रंगलं.

नुकत्याच झालेल्या गुजरात टायटन्सने आरसीबीचा आठ विकेट्सने पराभव केला. गुजरातच्या संघाची या सामन्यात उत्तम कामगिरी राहिली आहे. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 169 धावा केल्या. गुजरातने 170 धावांचा पाठलाग करताना 13 चेंडू शिल्लक असताना गाठले. गुजरातकडून जोस बटलरने आक्रमक खेळी करत नाबाद 73 धावा केल्या. साई सुदर्शनने 36 चेंडूत 49 धावा केल्या. या सामन्यात साई सुदर्शन आणि जोस बटलरने 75 धावांची भागीदारी केली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+