..तर वैभव सुर्यवंशी पुढच्या आयपीएल सीजनमध्ये खेळताना दिसणार नाही? विरेंद्र सेहवाग असे का म्हणाला?
IPL 2025 Vaibhav Suryavanshi : आयपीएलच्या इतिहासात विक्रम करणारा आणि आतापर्यंतच्या या प्रकारातील स्पर्धात सर्वात लहान खेळाडू म्हणुन स्पर्धा खेळणारा वैभव सूर्यवंशी हा पुढच्या आयपीएलमध्ये खेळू शकणार नाही तर मी खूप खेळाडूंना येताना बघितले असे वक्तव्य भारताच माजी स्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवाग याने केले आहे. त्याच्या वक्तव्याने सर्वाच्याच भुवया उंचावल्या आहेत.
विरेंद्र सेहवागने असे वक्तव्य का केले याची आता चर्चा होत आहे. पण आम्ही सांगतो की, विरेंद्र सेहवागने जेही वक्तव्य केले ते अगदी योग्य आणि वास्तव सांगणारे आहे.

काय म्हणाला विरेंद्र सेहवाग?
न्यूज 18 च्या वृत्तानुसार, विरेंद्र सेहवागने क्रिकबजवर म्हटले की, जर तुम्ही मैदानावर उतरल्यानंतर तुम्हाला माहीत आहे की, तुम्ही चांगला खेळ केला तर तुमची स्तुती होईल पण तुम्ही जर चांगला खेळ खेळला नाही तर तुमच्यावर टीकाही होईल हेही तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे तरच तुम्ही मैदानात टिकून राहाल. मी अशा अनेक खेळाडूंना जे एक दोन मॅच खेळले त्यांनी स्टारडम मिळवले आणि नंतर ते काही करु शकलेले नाहीत. कारण त्यांना वाटत होते की ते स्टार खेळाडू बनले.
..तर वैभव सुर्यवंशी पुढच्या आयपीएलमध्ये दिसणार नाही - सेहवाग
वीरेंद्र सेहवागने ..तर वैभव सुर्यवंशी पुढच्या आयपीएलमध्ये दिसणार नाही असे म्हटले आहे, त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या पण जरा विचार केला तर हे वक्तव्य अगदी सल्ला देणारे ठरते. सेहवाग म्हणाला, वैभव सूर्यवंशीने विराट कोहलीकडून शिकायला हवे, त्याने 20 वर्षे आयपीएल खेळण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. जर वैभव त्याच्या कामगिरीवर समाधानी असेल आणि तो कोट्यधीश झाला असा तो विचार करत असेल तर पुढच्या सीझनमध्ये तो दिसणार नाही.
वैभव सूर्यवंशीला राजस्थान राॅयलने 1 कोटी 10 लाख रुपयांना खरेदी केले आहे आणि तो सर्वात लहान वयात आयपीएल खेळणारा खेळाडू बनला आहे.
वैभव सूर्यवंशीचे रणजी ते आयपीलपर्यंत विक्रम
लखनऊ संघाविरुद्ध वैभव सूर्यवंशीचे पदार्पण
आज लखनऊ आणि राजस्थान राॅयल संघात सामना होत आहे. या सामन्यात राजस्थान संघाकडून खेळण्याची संधी वैभवला मिळाली, यासह वैभवने लखनऊविरुद्ध आपल्या पहिल्या वहिल्या आयपीएल सामन्यापासुन करीअरला सुरूवात केली आहे.
वैभव सूर्यवंशीची अवघ्या 14 वर्षांचा
वैभव सूर्यवंशी अवघ्या 14 वर्षांचा आहे, त्याचा जन्म 2011 मध्ये झाला आहे. खास बाब म्हणजे जेव्हा 2008 मध्ये इंडियन प्रीमियर लीग आयपीएलची सुरुवात झाली त्यानंतरचा त्याचा जन्म आहे. खरं पाहिलं तर वैभव सूर्यवंशी याने आश्चर्यकारक कामगिरी केली आहे; आयपीएलमध्ये खेळणारा तो पहिला खेळाडू ठरला जो स्पर्धेच्या सुरुवातीनंतर जन्माला आला.
रणजीत 12व्या वर्षी पदार्पण
- वैभव सूर्यवंशीने फक्त आयपीएलमध्येच विक्रम केला असे नाही तर रणजी ट्राॅफीतही त्याने विक्रम केला आहे.
- अवघे 12 वर्षे 284 दिवसाचा असातना त्याने रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलेय.
- वैभवने आतापर्यंत आपल्या फलंदाजीत अनेक शानदार खेळी खेळल्या आहेत.
- वैभव सूर्यवंशीला राजस्थान रॉयल्सने IPL 2025 साठी गेल्या वर्षी झालेल्या मेगा लिलावात 1.10 कोटी रुपयांना विकत घेतले होते.












Click it and Unblock the Notifications