Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Watch Video 14 वर्षांच्या 'या' इंडियन खेळाडूने जगातील सर्वात फास्ट बाॅलरला धपाधप कुटले; 4,4,4,6,4,4

आयपीएल २०२५ मध्ये राजस्थान राॅयल्सचा सामना राॅयल चेंलेंजर्स बेगलुरुसोबत आहे. या सामन्यांपूर्वी आज सकाळी राजस्थानच्या प्लेअर्सने नेटमध्ये प्रॅक्टीस केली. याच प्रॅक्टीसचा एक अफलातून व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड करु लागला आहे. हा व्हिडीओ आहे आरआरच्या १४ वर्षांच्या प्लेअर्सचा. वैभव सुर्यवंशीचा. वैभवला राजस्थान राॅयल्सने १.१ कोटी रुपयांच्या बोलीवर विकत घेतलेय. मात्र आज इंग्लंडच्या खतरनाक समजल्या जाणाऱ्या जोफ्रा आर्चरच्या बाँलिंगवर वैभव असा काही खेळलाय, की पाहणाऱ्यांनी तोंडेच बोटात घातली.

Vaibhav Suryavanshi viral video

कोणत्या व्हिडीओची होतेय चर्चा?

रविवारी जयपूरमध्ये इंडियन प्रीमियर लीग २०२५ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्धच्या सामन्यापूर्वी राजस्थान रॉयल्सच्या प्लेअर्सनी नेट सेशन चांगलाच घाम गाळला. याच प्रॅक्टीसमध्ये १४ वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीने आत्मविश्वासाने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरचा सामना केला . राजस्थान रॉयल्सने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर वैभवच्या सरावाचा व्हिडिओ शेअर केला. हाच व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे.

काय आहे व्हिडीओत?

या व्हिडीओत वैभवला जोफ्रा आर्चर बाँलिंग करत आहे. जोफ्रा पहिला बाँल बाऊंन्सर टाकतो. वैभव तो खेळताना चुकतो मात्र जोफ्राचा वेग, टप्पा आणि स्टाईलचा तो पहिल्याच बाँलमध्ये आभ्यास करतो. त्यानंतर जोफ्रा दुसऱा बाँल टाकतो. नंतर तिसरा, चौथा, पाचवा... जोफ्राचे सगळे बाँल वैभव अतिशय स्टाईलिश पद्धतीने टोलावतो. विशेष म्हणजे असे टोलावतो की, त्या प्रत्येक बाँलवर फोर किंवा सिक्सच गेला असता. वैभवने सुरुवातीला दाखवलेला संयम उल्लेखनीय होता. त्यानंतर बाउन्सर डक करत, लाईन आणि लेन्थ जलदपणे जज करत पुढचा प्रत्येक शाँट हा पाहणाऱ्यांना तोंडे बोटात घालायला लावणारा आहे.

वैभव आलाय चर्चेत

आयपीएलमध्ये अद्याप पदार्पण केलेले नसले तरी वैभव आधीच चर्चेत आहे. मेगा लिलावात वैभवला १.१ कोटी रुपयांना घेण्यात आले होते. वैभव बिहारमध्ये जन्मलेला आयपीएलच्या इतिहासातील सर्वात तरुण खेळाडू आहे. वैभवने केवळ १२ वर्षे आणि २८४ दिवसांत बिहारकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. गेल्या वर्षी चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत अंडर १९ संघाकडून ५८ चेंडूत शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या हंगामात पाच सामन्यांमध्ये पाच बळी घेणारा आर्चर नेटमध्ये एक कठीण आव्हान होते. पण वैभवसाठी, हे सरावसत्र चर्चेत आणणारे ठरले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+