Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Video : रोहितचा 'हा' विक्रम; MI ने दिलेला अवार्ड घेताना रोहित असं काय बोलला, की पांड्या बघतच राहिला?

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या आयपीएलमध्ये आपली कमाल दाखवतो आहे. पहिल्या काही सामन्यांत अपयशी ठरल्यानंतर रोहित शर्माने गेल्या दोन सामन्यांपासून जोरदार पुनरागमन केले. त्याच्या याच खेळीच्या बळावर मुंबई इंडियन्सने सलग चौथा विजय मिळवला. हैदराबादमध्ये रोहित शर्माने ४६ चेंडूत ७० धावा केल्या. या खेळाच्या जिवावर एमआयने सनरायझर्स हैदराबाद (एसआरएच) ला सात विकेट्सने पराभूत केले. रोहित शर्माला त्याच्या शानदार खेळीसाठी 'ड्रेसिंग रूम बॅटिंग अवॉर्ड' मिळाला. सूर्यकुमार यादवने त्याला हा अवार्ड दिला त्यावेळी टीमचे मालक अंबानीसह हार्दिक पांड्याही टाळ्या वाजवताना दिसले.

Rohit Sharma Award

रोहितचे सलग दोन अर्धशतके

रोहित शर्माने मुंबई इंडियन्सकडून खेळताना पहिल्या सहा सामन्यात फक्त ८२ धावा केल्या होत्या. परंतु गेल्या दोन सामन्यांमध्ये त्याने चमकदार कामगिरी केली. याशिवाय मुंबईकडून सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रमही केला. त्याने सीएसके विरुद्ध नाबाद ७६ आणि एसआरएच विरुद्ध ७० धावा केल्या. षटकारांच्या रेकाँर्डमध्ये रोहितने किरॉन पोलार्डला मागे टाकले आहे. २०१६ नंतर रोहितने सलग दोन आयपीएल सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावण्याची त्याची ही पहिलीच वेळ आहे.

सूर्याने दिला अवार्ड

मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज व टी-२० चा कर्णधार सूर्यकुमार यादव याने रोहित शर्माला 'ड्रेसिंग रूम बॅटिंग अवॉर्ड' दिला. फ्रँचायझीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. यामध्ये सूर्यकुमार यादव रोहितला पुरस्कार देताना दिसत आहे. या व्हिओखाली फ्रंचायझीने रोहितचे कौतूक केले. कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, रोहितने सलग दोन अर्धशतके झळकावली. ड्रेसिंग रूम बॅटिंग पुरस्कार. रोहित शर्माने मैदानावर सर्वत्र फटके मारले आणि आम्हाला ते खूप आवडले.

काय म्हणाला रोहित?

ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंना संबोधित करताना रोहित शर्मा म्हणाला की, आपल्याला सातत्याने चांगली कामगिरी करत राहावे लागेल. खेळ सुरू होण्यापूर्वी मी म्हणालो होतो की आपल्याला सातत्याने काही नव्या गोष्टी करायला हव्यात. आज त्या चांगल्या गोष्टींचा चांगला प्रत्यय आला. चला हे चालू ठेवूया. रोहित शर्माची अलीकडील कामगिरी त्याच्या सुरुवातीच्या संघर्षांपेक्षा खूपच वेगळी आहे. जेव्हा ५ वेळा चॅम्पियन असलेला कर्णधार रोहित शर्मा बोलत होता, तेव्हा त्याच्या शेजारी बसलेला हार्दिक पंड्या शांतपणे ऐकत होता, तर संघाचे मालक आकाश अंबानीने रोहितचे भाषण संपल्यावर उत्साहाने टाळ्या वाजवल्या.

कशी राहीली रोहितची कामगिरी?

रोहित शर्माने या हंगामात आठ सामन्यांमध्ये ३२.५७ च्या सरासरीने आणि १५४.०५ च्या स्ट्राईक रेटने २२८ धावा केल्या आहेत. एसआरएचवर विजय मिळवून मुंबई इंडियन्स पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर आहे. त्याचे ९ सामन्यात १० गुण आहेत. एमआय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स यांचे गुण समान आहेत, परंतु एमआयचा नेट रन रेट चांगला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+