IPL-2025 : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर BCCIचे 4 मोठे निर्णय; नो चीअरलीडर्स, हाताला काळी पट्टी!
IPL 2025, Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर बीसीसीआयच्या वतीने आयपीएल सामन्यासंदर्भात काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. आज बुधवारी (दि.23) मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल सामन्यात ते बदल दिसून येणार आहेत.
बुधवारी 41 वा आयपीएल सामना सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला जाईल. या सामन्यात, सलग पराभवांना तोंड देत असलेल्या सनरायझर्स हैदराबाद (SRH) संघाला त्यांच्या घरच्या मैदानावर मुंबई इंडियन्स (MI) विरुद्ध पुनरागमन करण्याची आशा असणार आहे. अशातच बीसीसीआयने कालच्या झालेल्या हल्ल्यानंतर काही महत्त्वाचे बदल केले आहेत.

बीसीसीआयच्या वतीने 4 मोठे बदल!
आयपीएल सामन्याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वतीने 4 मोठे बदल करण्यात आले आहेत. मंगळवारी पहलगाम येथील हल्ल्यात 28 निष्पापांचा अतिरेक्यांनी जीव घेतला. मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी बीसीसीआयने हा मोठा निर्णय घेतला आहे.
- सर्वप्रथम, हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयपीएल सामन्यांदरम्यान पंच आणि खेळाडू काळ्या पट्ट्या बांधतील.
- दुसरी गोष्ट म्हणजे सामना सुरू होण्यापूर्वी एक मिनिट शांतता पाळली जाईल.
- तिसरी गोष्ट म्हणजे हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यासाठी मैदानावर कोणतेही चीअरलीडर्सला एंट्री नसणार.
- चौथी गोष्ट म्हणजे या सामन्यात फटाके वाजवले जाणार नाहीत. एकंदरीत सर्व साधेपणाचे नियम पाळले जातील.
मुंबई हल्ल्यानंतर PAKशी द्विपक्षीय क्रिकेट संबंध तोडले
2008 साली 26/11 मुंबई दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानशी द्विपक्षीय क्रिकेट संबंध तोडले. भारतीय संघाने अलीकडेच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा दौरा करण्यास नकार दिला होता. ज्यामुळे आयसीसीने भारताचे सर्व सामने दुबईमध्ये घेतले होते.
SRH विरुद्ध MI- हेड टू हेड
सनरायझर्स हैदराबादने आतापर्यंत सातपैकी फक्त दोन सामने जिंकले आहेत. सनरायझर्स संघ नवव्या क्रमांकावर आहे. तर मुंबई संघाने 8 पैकी 4 सामने जिंकले आहेत. ते सहाव्या स्थानावर आहे. आतापर्यंत खेळल्या गेलेल्या 24 आयपीएल सामन्यांपैकी SRH ने 10 जिंकले आहेत तर मुंबई इंडियन्सने 14 जिंकले आहेत.
SRH प्लेइंग-11
ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, इशान किशन, नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), अनिकेत वर्मा, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल अब्शान पटेल, मोहम्मद झेंडे, मलेशिया, मलेशिया, मलेशिया, इशान. मनोहर, सचिन बेबी, राहुल चहर, विआन मुल्डर, जयदेव उनाडकट, कामिंदू मेंडिस, अथर्व तायडे, सिमरजीत सिंग, स्मरण रविचंद्रन.
MI प्लेइंग - 11
रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, कर्ण शर्मा, कॉर्बिन बॉश, रजविन कुमार, मिन, रॉबिन, रॉबिन, रॉबिन, रॉबिन टोप मुजीब उर रहमान, कृष्णन सृजित, अर्जुन तेंडुलकर, बेव्हॉन जेकब्स, सत्यनारायण राजू, विघ्नेश पुथूर.
-
Eid mubarak 2026 wishes marathi : आपल्या जोडीदाराला पाठवा 'हे' रोमँटिक ईद शुभेच्छा संदेश आणि शायरी! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी






Click it and Unblock the Notifications