शुभमन गिल लग्न करणार का? आयपीएल सामन्यात कमेंटेटरच्या प्रश्नावर शुभमचं दोन शब्दात उत्तर
IPL 2025 : आयपीएल 2025 च्या सामन्यादरम्यान गुजरात टायटन्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामन्याच्या टॉसवेळी एक खास प्रसंग घडला आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलला कमेंटेटर डॅनी मॉरिसन यांनी लग्नाबद्दल प्रश्न विचारला. त्यावेळी काही वेळ मैदानावर विनोदी वातावरण पाहायला मिळाले.

या सामन्यात केकेआरने टॉस जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले, परंतु गिलच्या खाजगी आयुष्याबद्दलचा हा प्रश्न चर्चेचा विषय ठरला. गिलने हसत हसत या प्रश्नाचे उत्तर दिले, जे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे.
दरम्यान 21 एप्रिल 2025 रोजी कोलकत्याच्या ईडन गार्डनवर झालेल्या या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने टॉस जिंकला आणि गुजरात टायटन्सला प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली. या सामन्याच्या टॉसवेळी कमेंटेटर डॅनी मॉरिसनने गिलला प्रश्न विचारला, "तू खूप स्मार्ट दिसतोस, लग्नाची घंटा वाजणार का? लवकरच लग्न करणार का?" या प्रश्नाने गिल हसला आणि म्हणाला, "नाही, असे काही नाही." या हलक्या-फुलक्या प्रसंगाने मैदानावर उपस्थित प्रेक्षकांनी हसले आणि सामन्याला थोडा मनोरंजनाचा डोस मिळाला.
गिलने या सामन्यात 55 चेंडूंमध्ये 90 धावांची खेळी केली केली. ज्यामध्ये 10 चौकार आणि 3 षटकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीमुळे गुजरातने 198/3 अशी मजबूत धावसंख्या उभारली. केकेआरला हा सामना जिंकण्यासाठी 199 धावांचे लक्ष्य मिळाले. परंतु त्यांची फलंदाजी कमकुवत पडली आणि गुजरातने विजय मिळवला.
आयपीएल 2025 मधील शुभम गिलची कामगिरी
शुभमन गिल सध्या आयपीएल 2025 मध्ये गुजरात टायटन्सचा कर्णधार म्हणून चमकदार कामगिरी करत आहे. त्याने 8 सामन्यांत 305 धावा केल्या आहेत, ज्याचा सरासरी 43.57 आणि स्ट्राइक रेट 153.27 आहे. त्याच्या खात्यात 2 अर्धशतके आणि सर्वोच्च 90 धावांची खेळी आहे.
गुजरात टायटन्स सध्या पॉईंट टेबलमध्ये पहिल्या स्थानावर आहे, ज्यामध्ये 8 पैकी 6 सामने जिंकले आहेत आणि 12 गुणांसह नेट रन रेट 1.104 आहे. गिलच्या नेतृत्वाखाली गुजरातने गेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सवर 7 विकेटनी विजय मिळवला होता, ज्यामध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्याची फलंदाजी आणि कर्णधार म्हणून रणनीती यामुळे संघाला सातत्य यश मिळत आहे.












Click it and Unblock the Notifications