Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

CSKवर 2 वर्षांची बंदी लागणार?, MI सोबत खेळताना बॉल टेम्परिंगचा आरोप; सोशल मीडियावर Video व्हायरल

ipl 2025 csk ruturaj gaikwad and khaleel ahmed accuses of ball tampering : आयपीएल 2025 च्या दुसऱ्या दिवशी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना पार पडला. आयपीएल लीगच्या इतिहासातील दोन सर्वात यशस्वी संघ आमनेसामने आले. पण चेन्नईच्या संघाने हा सामना 4 विकेट्सने सहजतेने जिंकला.

या सामन्यात खलील अहमद याने मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना चांगलेच पाणी पाजले. पण सामन्यानंतर एक व्हिडिओ व्हायरल झाला, जो पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याच्यावर बॉल टॅम्परिंगचा आरोप करायला सुरुवात केली.

मुळात वनइंडिया मराठी या व्हायरल व्हिडिओची पुष्टी करत नाही. परंतु, सोशल मीडियावर चाहते या कमेंट करून ऋतूराज आणि खलील अहमदवर बॉल टेम्परिंगचा आरोप करत नाहीत. जर हे सत्य असेल तर खरच क्रिकेट नियामक मंडळ काही कारवाई करणार का हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे.

ipl 2025

व्हायरल व्हिडिओत नेमकं काय दिसतंय?

सामन्यात सीएसकेच्या विजयानंतर, सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये खलील अहमद त्याच्या खिशातून काहीतरी काढताना दिसत आहे. इतक्यात, ऋतुराज गायकवाड येतो, दोघेही काहीतरी बोलतात आणि चेंडू खलीलकडे सोपवतात. मग निघताना, खालिद अहमद शांतपणे कॅप्टनला काहीतरी देतो, जे तो त्याच्या खिशात ठेवतो.

खलील गोलंदाजी करताना धावपट्टीवर मार्क करत असताना पहिल्याच षटकात ही घटना घडली. याबाबत, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावर आता लोकांकडून प्रतिक्रिया दिली जात आहे. काही चाहत्यांनी तर चेन्नई सुपर किंग्जवर बॉल टॅम्परिंगचा आरोप केला. त्याचवेळी, एका चाहत्याने असेही लिहिले की, सीएसकेवर 2 वर्षांची बंदी घातली जाऊ शकते.

बॉल टेम्परिंग अन् बंदीचा काय आहे नियम?

क्रिकेट जगतात नियामक मंडळाच्या वतीने अनेक नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यातलाच बॉल टॅम्परिंग हा एक नियम आहे.

ज्यामध्ये जर कोणी बॉलशी छेडछाड करताना पकडले गेले तर त्याला शिक्षा होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही हा नियम अनेकदा दिसून आला आहे.

ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा समावेश असलेला सॅंडपेपर गेट घोटाळा सर्वात लोकप्रिय होता. यामध्ये स्टीव्ह स्मिथ, डेव्हिड वॉर्नर आणि कॅमेरॉन बॅनक्रॉफ्ट यांना कठोर शिक्षा देण्यात आली होती.

आयपीएलमध्ये अजूनही बॉलशी छेडछाड नाही

आयपीएलमध्ये आतापर्यंत असे कोणतेही प्रकरण समोर आलेले नाही. पण यावेळी हा मुद्दा किती तापणार हे काही तासांत किंवा दिवसांत कळेल.

साधारणपणे, क्रिकेटच्या नियमांनुसार, एमसीसी कायदा 42.3 अंतर्गत बॉल टॅम्परिंग हा गुन्हा मानला जातो. याअंतर्गत, असे करणाऱ्या खेळाडू किंवा संघावर एक ते दोन वर्षांपर्यंत बंदी घातली जाऊ शकते, असेही नियमांत सांगितले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+