Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मुंबई संघात सर्वकाही आलबेल नाही? "मला काही करायचं नाही!"- रोहीत शर्मा जहीर खानला असं का म्हणाला?

IPL 2025 Rohit Sharma talks to Zaheer Khan : रोहीत शर्मा भारताचा धुरंधर खेळाडू...अव्वल दर्जाचा बॅट्समन तो जेव्हा खेळतो तेव्हा षटकांराची बरसात होते आणि सामना एकहाती फिरवतो. अलीकडे रोहीत शर्मा त्याच्या फाॅर्ममुळे चिंतेत आहे.

आयपीएल सीजनमध्ये मात्र त्याला फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. सलामीला येऊन फलंदाजी करणारा रोहीत मागील तिन्ही सामन्यात अपयशी ठरला. त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या नाहीत. एवढेच नाही तर आगामी भारताच्या दौऱ्यात संघातील त्याच्या निश्चिततेसंदर्भात शंका उत्पन्न होत आहे, आयपीएलमध्ये मुंबई संघात असूनही रोहीत फारसा खूश दिसतोय असे नाही हे चाहते म्हणतात.

IPL 2025 Rohit Sharma talks to Zaheer Khan

तर असो पण एक व्हिडिओ समोर आला आहे. त्या व्हिडिओचे वेगवेगळे अर्थ चाहते काढत आहेत. मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सूपर जायंट्स यांच्यात येत्या पाच एप्रिलला सामना होणार आहे, यामध्ये रोहीत शर्मा काय चमत्कार करणार हे मात्र त्याची बॅटच सांगणार आहे.

मैदानात जहीर खानसोबतच त्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ मुंबई इंडियन्सने त्यांच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओत रोहीत शर्मा काहीसा बोलत असतानाचे स्वर ऐकू येतात. तो नेमके काय बोलतो हे पुर्णपणे जरी ऐकू येत नसले तरीही दोन चार शब्द मात्र थेट लक्षात घेण्यासारखे आहेत.

ऋषभ पंतची दोघांच्या संभाषणात एंट्री

रोहित शर्मा आणि झहीर खान चर्चा करतानाचा हा व्हिडिओ आहे, दोघे काय चर्चा करतात हे समजलेले नाही पण रोहित शर्मा झहीर खानशी बोलताना म्हणतोय की, "जेव्हा करायचं होतं तेव्हा सगळं केलं, आता मला काही करायची गरज नाही." रोहित शर्माची ही दोनच वाक्यं या व्हीडिओमध्ये ऐकू येत आहेत.. याचा अर्थ मात्र चाहते वेगवेगळ्या पद्धतीने घेत आहेत, तर दुसरीकडे ही दोन वाक्य संपताच ऋषभ पंत रोहितला मागून येऊन मिठी मारतो. रोहित आणि झहीरचा हा व्हीडिओ चांगलाच व्हायरल होत असून चाहत्यांकडून यावर कमेंट्स आल्या आहेत.

आया है राजा...बॅकग्राऊंडला संगीत

यादरम्यान आणखी एक व्हिडिओ लखनऊ संघाने शेअर केला आहे. यामध्ये रोहित शर्मा, ऋषभ पंत आणि झहीर खान दिसतात. त्यात ऋषभ पंत आणि रोहित मस्ती करत असल्याचे दिसत आहेत. तर रोहितही झहीर खानबरोबर गप्पा मारताना 'आया है राजा' हे गाणं लखन संघाने या व्हीडिओसाठी बॅकग्राऊंडला लावलं आहे.
आता लखनऊसोबतच्या सामन्यात रोहीत काय कामगिरी करतो हे पाहायचे आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+