Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

रोहित शर्माने 26 धावांची छोटीशी खेळी करुन रचला इतिहास, वानखेडे स्टेडियमवर रचला शतकाचा विक्रम

IPl 2025 : आयपीएल 2025 च्या 33 व्या सामना मुंबई इंडियन्स (MI) विरुध्द सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांच्यात काल मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सामना झाला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने हैदराबादचा 4 विकेट्सने पराभूत करून त्यांची पराभवाची मालिका मोडीत काढली आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा दिग्गज खेळाडू रोहित शर्मा याने एक नवीन इतिहास रचला आहे.

रोहित शर्माने वानखेडे स्टेडियमवर आयपीएलमध्ये 100 षटकार लगावणारा पहिला फलंदाज ठरला आहे. या कामगिरीने त्यांनी क्रिकेट विश्वात आणखी एक विक्रम नोंदवला आहे.'इम्पॅक्ट प्लेअर' म्हणून मैदानात उतरलेल्या रोहितने 16 चेंडूंमध्ये 26 धावा केल्या, ज्यामध्ये 3 षटकारांचा समावेश होता. या सामन्यातील रोहीतच्या या छोट्या खेळीने क्रिकेटप्रेमींचे चांगलेचं मनोरंजन झाले.

Rohit Sharma


फोटो सौजन्य- पीटीआय

आयपीएल 2025 च्या 33व्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुध्द सनराइजर्स हैदराबाद यांच्यात 17 एप्रिल 2025 रोजी वानखेडे स्टेडियमवर लढत झाली. या सामन्यात सनराइजर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 162 धावांचे टार्गेट देण्यात आले. मुंबई इंडियन्सने या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्माला 'इम्पॅक्ट प्लेअर' म्हणून मैदानात उतरवले. या सामन्यात रोहीतने 16 चेंडूंमध्ये 26 धावा काढल्या, ज्यामध्ये 3 षटकारांचा समावेश होता. त्यांची ही खेळी संघाला सुरुवातीला चांगला आधार देण्यात यशस्वी ठरली, परंतु मोठी खेळी करता आली नाही.

रोहितने वानखेडे स्टेडियमवर रचला शतकाचा विक्रम

रोहीतीने मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर पहिल्याच षटकार लगावत वानखेडेवर 100व्या षटकाराचा विक्रम नोंदवला आहे. या कामगिरीमुळे त्यांनी आयपीएलमध्ये एकाच मैदानावर 100 किंवा त्यापेक्षा जास्त षटकार लगावणाऱ्या फलंदाजांमध्ये चौथे स्थान मिळवलं आहे. रोहितने आता विराट कोहली (बंगळुरू), एबी डिव्हिलियर्स (बंगळुरू) आणि क्रिस गेल (बंगळुरू) या दिग्गज खेळाडूंच्या या यादीत सामील झाला आहे. या खेळाडूंनी एकाच मैदानावर 100 किंवा त्यापेक्षा जास्त षटकार लगावले आहेत.

रोहित शर्मा हा सध्याच्या आयपीएल 2025 सीझनमध्ये आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नसला तरी त्यांची प्रत्येक खेळी चाहत्यांना उत्साहित करते. या सामन्यात त्यांने मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर षटकार लगावत वानखेडेवर 100व्या षटकाराचा टप्पा गाठला. त्यांनी 16 चेंडूंमध्ये 3 षटकार लगावत 26 धावा केल्या आहेत.

रोहितचा सध्याचा खराब फॉर्म

रोहित शर्मा हा आयपीएलच्या या सीझनमध्ये आपल्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नसल्याचे दिसत आहे. रोहीतने 6 सामन्यांत 82 धावा काढल्या असून त्यांची सरासरी 13.66 आहे. या सीझनमध्ये 0, 8, 13, 17, 18 आणि 26 अश्या धावा केल्या आहेत. रोहीच्या खराब फॉर्ममुळे त्याच्यावर अनेकवेळा टीका ही होतं आहे. अनेकजण त्यांच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थितीत करत आहेत. मात्र रोहित शर्माच्या या विक्रमानंतर पुढील सामन्यांत त्यांच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. मुंबई इंडियन्सचा पुढील सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध आहे. ज्यामध्ये रोहितचा फॉर्म महत्त्वाचा असेल. जर त्याने मोठी खेळी केली तर मुंबईला विजयाची शक्यता वाढेल.

रोहीतसाठी वानखेडे स्टेडियम आहे खास

वानखेडे स्टेडियम हे रोहित शर्मा यांच्यासाठी नेहमीच खास राहिले आहे. या मैदानावर त्यांनी मुंबई इंडियन्ससाठी कर्णधार म्हणून 5 वेळा आयपीएल विजेतेपदे जिंकल आहे. तसेच त्याने याच स्टेडियम 2,350 पेक्षा जास्त धावा आणि 100 षटकार लगावले आहेत. म्हणून रोहीतसाठी हे स्टेडियमशी खास नातं असल्याचं म्हटलं जातं. मुंबई क्रिकेट असोसिएशनने नुकतेच या स्टेडियममध्ये एक स्टँड रोहीतच्या नावाने नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे, ज्यामुळे त्यांचा हा विक्रम आणखी महत्त्वाचा ठरतो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+