Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

विराटचा पत्ता कट, 18 व्या सीझनसाठी रजत पाटीदारकडे आरसीबीच्या कर्णधार पदाची जबाबदारी

IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने आज 13 फेब्रुवारी रोजी इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 साठी त्यांच्या नवीन कर्णधाराच्या नावाची घोषणा केली आहे. फ्रँचायझीने आगामी सीझनसाठी रजत पाटीदारला कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे. गुरुवारी एका विशेष कार्यक्रमात ही घोषणा करण्यात आली आहे.

Rajat Patidar

फोटो सौजन्य- पीटीआय

या नियुक्तीपुर्वी पाटीदार यांनी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी सारख्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये मध्य प्रदेश संघाचं नेतृत्व केले होते. त्याने त्याच्या राज्य संघाचे यशस्वी नेतृत्व केलं आहे. मेगा लिलावापूर्वी फ्रँचायझीने माजी कर्णधार फाफ डु प्लेसिसला सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाटीदारचं महत्व वाढलं आहे.

विराट कोहलीने केलं रजत पाटीदारचे अभिनंदन

विराट कोहलीने पाटीदारला त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी अभिनंदन केलं आहे. कोहली म्हणाला अभिनंदन रजत, तू तुझ्या कामगिरीने आरसीबी चाहत्यांच्या हृदयात एक खास स्थान निर्माण केले आहेस. मला खात्री आहे की तुम्ही फ्रँचायझीला पुढे नेहशील. कोहलीचा हा पाठिंबा पाटीदार संघातील वाढत्या प्रतिष्ठा दर्शवितो.

आयपीएल 2025 साठी आरसीबीचा संघ

विराट कोहली, रजत पाटीदार (कर्णधार), यश दयाल, लियाम लिव्हिंगस्टोन, रसिक दार, सुयश शर्मा, कृणाल पंड्या, भुवनेश्वर कुमार, स्वप्नील सिंग, टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड, नुवान तुषारा, मनोज भंडागे, जेकब बेथेल, देवदत्त पडिकल, स्वस्तिक चिकारा, लुंगी न्गीडी, अभिनंदन सिंग, मोहित राठी, फिल साल्ट, जितेश शर्मा, जोश हेझलवुड.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+