"हार का दर्द शराब से..!" राजस्थानचा सलग 5 वा पराभव, CEO पोहचले दारुच्या दुकानाजवळ; Video व्हायरल!
IPL 2025 Rajasthan Royals 5th consecutive defeat : राजस्थान राॅयल्स या आयपीएलच्या हंगामात सुरुवातीच्या काही सामन्यात जबरदस्त फार्ममध्ये होती. या संघाने चांगली कामगिरी केली पण हळूहळू दर सामन्यागणिक या संघाची कामगिरी ढासळत आहे.
गुरुवारी 24 एप्रिल 2025 रोजी राॅयल चॅलेंजर बंगळुरुने 11 धावांनी राजस्थान राॅयलचा पराभव केला. हा राजस्थान राॅयलचा पाचवा पराभव आहे. या पराभवानंतर या संघावर आणि खेळाडूवर टीका होत आहे. अशातच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे आणि त्यामुळे आता खूपच चर्चा रंगत आहे.

काय आहे हा व्हायरल व्हिडिओ?
व्हायरल व्हिडिओ असा आहे की, राॅयल चॅलेंजर बंगळुरुविरुद्ध सामना झाला आणि अवघ्या अकरा धावांनी राजस्थान संघाचा पराभव झाला. हा पराभवानंतर चाहते स्टेडीयममधून बाहेर जात होते त्यावेळी राजस्थान राॅयल संघाचे सीईओ जेक लश मॅक्रम हेही बाहेर निघाले. स्टेडीयमजवळच लिकरचे अर्थात दारुचे दुकान होते. राजस्थान संघाचे सीई जेक लश मॅक्रम हे दुकानजवळ जात असल्याचे दिसून आले. हा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.
RR owner walks straight to Tonique after the loss against RCB#RCBvsRR pic.twitter.com/p1HkR06isd
— Sumukh Ananth (@sumukh_ananth) April 24, 2025
क्रिडा रसिकांकडून या व्हिडिओद्वारे भाष्य!
क्रिडा रसिकांनी या व्हिडिओवर आपले भाष्य केले आहे. "हार का दर्द शराब से मिटा रहे है राजस्थान राॅयलके सीईओ..!" असे म्हणत एका रसिकाने या व्हिडिओत भाष्य केले आहे. आता या व्हिडिओवर कमेंट पडलेल्या दिसून येत आहे.
राजस्थान राॅय़ल गुणतालिकेत कितव्या स्थानावर
राजस्थान राॅय़लला काल पराभव स्वीकारावा लागला. राॅयल चॅलेंजर बंगळुरुने या संघाला मात दिली. या पराभवानंतर राजस्थान राॅयल संघ आठव्या स्थानावर फेकला गेला आहे. या संघाने एकूण 9 सामने खेळले असून त्यात 2 विजय मिळवले आहेत तर एकूण 7 सामने संघाने गमावले आहेत. या संघाचे फक्त 4 गुण आहेत. तर राजस्थानने सलग पाचवा सामना काल गमावला आहे.
गुजरात पहिल्या, दिल्ली दुसऱ्या स्थानावर ..
पहिल्या स्थानावर 12 गुणांसह गुजरात संघ पहिल्या, दिल्ली कॅपीटल 12 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, सरासरीत गुजरात पुढे असल्याने या संघाला पहिले स्थान दिले गेले आहे तर तिसऱ्या स्थानावर आरसीबीने 12 गुणांसह झेप घेतली आहे. मुंबई संघाने 10 गुणांसह चौथे स्थान तर पाचव्या स्थानी पंजाब संघ 10 गुणांसह तर एवढ्याच गुणांसह लखनऊ संघ सहाव्या स्थानी, सातव्या स्थानावर 6 गुणांसह कोलकाता नाईट रायडर आणि राजस्थान आठव्या स्थानी आहे तसेचनवव्या स्थानी हैदराबादचा संघ 4 गुणांसह आणि चैन्नई सूपरकिंग्ज संघ 4 गुणांसह तळाच्या स्थानावर आहे.












Click it and Unblock the Notifications