IPL 2025 points table : आयपीएल गुणतालिकेत मोठे फेरबदल! 'ही' टीम नंबरवन; प्ले ऑफमध्ये कोण येणार? वाचा

IPL 2025 points table after pbks vs lsg match which team is top : आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आता मोठी रंगत आली असून प्ले ऑफची शर्यत आणखीनच रंगतदार बनत आहे. जवळपास सर्वच संघ दहा आणि त्यापेक्षा अधिक सामने खेळले आहेत. त्यामुळे आता प्ले ऑफमध्ये कोण - कोण पोहचणार याचीच उत्सुकता सर्वांना लागली आहे.

रविवारी 4 मे 2025 रोजी झालेल्या डबलडेकर लढतीनंतर गुणतालिकेत मोठे बदल झाले आहेत. पहिला सामना कोलकाता विरुद्ध राजस्थान राॅयल संघात होता तर दुसरा सामना पंजाब विरुद्ध लखनऊ संघात होता. या सामन्यात कुणी विजय मिळवला आणि गुणतालिकेत काय बदल झाला कोणता संघ कोणत्या स्थानी हे जाणून घेऊया.

IPL 2025 points table

केकेआर सहाव्या, राजस्थान पोहचली आठव्या स्थानी

रविवारी आयपीएलमध्ये डबल हेडरचा पहिला सामना खूपच रोमांचक झाला. या सामन्यात, रियान पराग त्याच्या शतकाच्या अगदी जवळ होता आणि शेवटच्या चेंडूवर केकेआरने एका धावेने विजय मिळवला. केकेआरसाठी हा सामना जिंकणे खूप महत्त्वाचे होते. आता केकेआर सहाव्या स्थानी पोहचली आहे.

हेही वाचा : आयपीएल खेळण्यासाठी पाकिस्तानातून येतोय 'हा' खेळाडू? यामुळे मिळाली अचानक संधी

पंजाब गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी

रविवारी लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध पंजाब किंग्जने एकतर्फी विजय मिळवला. या विजयासह पंजाब किंग्जने प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. पंजाब गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहचला.

हेही वाचा : आयपीएल 2025 मध्ये 'या' खेळाडूने मारला सर्वात लांब षटकार! वाचा लांब सिक्स मारणारे टाॅप 10 बँट्समन

तीन सामने जिंकले तरच लखनऊ प्लेऑफमध्ये

लखनऊकडून रविवारी पंजाबकडून पराभव स्वीकारावा लागला. या पराभवामुळे लखनऊसाठी पुढचा रस्ता कठीण झाला आहे. प्लेऑफमध्ये प्रवेश करण्यासाठी लखनऊला उर्वरित तीनही सामने जिंकावे लागतील.

गुणतालिकेत कोण कोणत्या स्थानावर? (IPL 2025 points table)

  • पहिल्या स्थानी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) - 11 सामन्यात 16 गुण
  • दुसऱ्या स्थानी पंजाब किंग्ज (पीबीकेएस) 11 सामन्यात 15 गुण
  • तिसऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स (एमआय) 11 सामन्यात 14 गुण
  • चौथ्या स्थानी गुजरात टायटन्स (GT) 10 सामन्यात 14 गुण
  • पाचव्या स्थानी दिल्ली कॅपिटल्स (डीसी) 10 सामन्यात 12 गुण
  • सहाव्या स्थानी कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) 11 सामन्यात 11 गुण
  • सातव्या स्थानी लखनऊ सुपर जायंट्स (एलएसजी) 11 सामन्यात 10 गुण
  • आठव्या स्थानी राजस्थान रॉयल्स (आरआर) 12 सामन्यात 6 गुण
  • नवव्या स्थानी सनरायझर्स हैदराबाद (SRH) 10 सामन्यात 6 गुण
  • दहाव्या स्थानी चेन्नई सुपर किंग्ज (CSK) 11 सामन्यात 4 गुण
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+