आयपीएल खेळण्यासाठी पाकिस्तानातून येतोय 'हा' खेळाडू? यामुळे मिळाली अचानक संधी
IPL 2025 This player is coming from Pakistan to play : एकीकडे आयपीएलचा हंगाम जोरात सुरु असताना दुसरीकडे पहलगाम हल्ल्याने भारतीयांची मनं दुखावली आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर क्रिकेटपटूंनाही मोठे दुःख झाले. एवढेच नाही तर पाकिस्तानातील क्रिकेटपटू दानिश कानेरिया यानेही आपल्या सहवेदना व्यक्त केल्या. त्याने पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान सरकारवर तोफ डागत या हल्ल्याचा निषेध का करत नाही असा जाबही विचारला होता.

एवढे सर्व घडताना आता पाकिस्तानातून एक खेळाडू भारतात सुरु असलेल्या आयपीएल स्पर्धेत सामने खेळण्यासाठी येत आहे. त्यामुळे सर्वांच्याच भुवया आता उंचावल्या आहेत. हा आयपीएल खेळाडू कोण आहे याचीच सर्वांना माहिती जाणून घ्यायची आहे.
UPDATE: Mitchell Owen replaces Glenn Maxwell for the rest of #TATAIPL 2025 season. pic.twitter.com/yX7Z8uamMt
— Punjab Kings (@PunjabKingsIPL) May 4, 2025
आयपीएल स्पर्धेत पंजाब संघाकडून खेळणार हा खेळाडू
पंजाब किंग्सने यंदाच्या आयपीएल स्पर्धेत आपला सर्वोत्तम खेळ केला आहे आणि हा संघ अंतीम आठमध्ये प्रवेश करण्याची दाट शक्यता आहे. पण या संघासाठी एक वाईट बातमी आली आहे. या संघातील स्टार आणि अनुभवी ऑलराउंडर खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याला दुखापतीमुळे आयपीएल 2025 मधून बाहेर पडावे लागत आहे. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूचा विचार केला आहे.
पाकिस्तान सूपर लिगमधून येणार खेळाडू
ग्लेन मॅक्सवेल हा संघात आता राहणार नाही, त्यामुळे त्याच्या जागी पाकिस्तानातून खेळाडू येणार आहे. हा खेळाडू सध्या पीएसएल अर्थात पाकिस्तान सुपर लीग स्पर्धेत खेळत आहेत. या खेळाडूने गेल्या काही महिन्यांत टी - 20 क्रिकेटमध्ये जोरदार कामगिरी केली आहे.
आयपीएलमध्ये पहिल्यांदा करणार पदार्पण
पाकिस्तानातून येणारा खेळाडू भारतात सुरु असलेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेत सहभाग होणार आहे. पंजाबच्या संभाव्य संघात स्थान मिळवणारा या खेळाडूने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलेले नाही.
आयपीएलसाठी पाकिस्तानमधून येणारा खेळाडू कोण?
पंजाब किंग्स टीमने ग्लेन मॅक्सवेल याच्या जागी ऑस्ट्रेलियाचा अनकॅप्ड ऑलराउंडर मिचेल ओवन याचा समावेश करण्यात आला आहे. तो सध्या पीएसएलमध्ये पेशावर जाल्मी टीमकडून खेळत आहे. बाबर आझम या संघाचं नेतृत्व करतो. पेशावर जाल्मीसंघाकडून आतापर्यंतचे सर्व 7 सामने त्याने खेळले आहेत. पीएसएलचा अंतीम सामना 18 मे रोजी होईल, त्यानंतर लगेचच हा खेळाडू पंजाबसाठी प्लेऑफ सामन्यांसाठी उपलब्ध असेल. मात्र अजून पंजाबचं प्लेऑफचं तिकीट निश्चित झालेले नाही.
कोण आहे मिचेल ओवन?
- मिचेल ओवन हा आस्ट्रेलियन खेळाडू आहे.
- ऑस्ट्रेलियातील प्रतिष्ठेच्या बीबीएल अर्थात बीग बॅश लीग स्पर्धेत मिचेलने अंतिम सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली होती. मिचेलने तेव्हा 257 च्या स्ट्राईक रेटने 42 बॉलमध्ये 108 धावा कुटल्या होत्या.
- मिचेलने या डावात 10 षटकार आणि 5 चौकार ठोकले होते.
- मिचेलने या हंगामातील एकूण 11 डावांमध्ये 45 सरासरीने आणि 203 च्या स्ट्राईक रेटने 452 धावा केल्या होत्या.












Click it and Unblock the Notifications