IPL 2025 मध्ये मुंबईचा धमाका! पहिल्या स्थानी पोहचली, अंतीम आठमध्ये आता चूरस, CSK, RR घरी जाणार?
IPL 2025 points table after mi vs rr match which team is top : IPL 2025 मध्ये मुंबई संघाने मोठा धमाका केला आहे, राजस्थान राॅयल्सला नमवून हा संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहचला आहे, आता या संघातील सर्वच फलंदाज फार्मात आले असून या संघाच्या गोलंदाजीनेही दाणादाण उडवली आहे. आरसीलाही या संघाने मागे टाकले आहे.

राजस्थान राॅयल्सची घसरगुंडी
आयपीएलमध्ये कालचा सामना मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात झाला, मुंबई इंडियन्सने हा सामना तब्बल 100 धावांनी जिंकला आणि धावांच्या सरासरीतही सरस ठरत पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थान मिळवले. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 2 बाद 217 धावा केल्या; प्रत्युत्तरात, रॉयल्सचा संघ 117 धावांवर गारद झाला. या पराभवामुळे राजस्थानचा संघ आठव्या स्थानीपोहचला आहे.
आयपीएल पाॅईंटटेबलमध्ये एकवेळ मुंबईचीही हिच अवस्था झाली होती परंतु मुंबई संघात राखेतून फिनिक्स पक्षासारखी उभारी घेण्याची क्षमता आहे. त्यामुळे या संघाला कुणीच सहज घेत नाही आणि आताही तेच झाले तळातून वर सरकत सरकत हा संघ आयपीएल 2025 हंगामात सर्वात अव्वल स्थानी पोहचला आहे.
आयपीएलमध्ये अंतीम आठ संघ पुढच्या फेरीत प्रवेश करणार आहेत. आता मुंबईने सर्वात वरचे स्थान प्राप्त केल्यामुळे चुरस निर्माण झाली असून राजस्थानला घरचा रस्ता धरावा लागू शकतो तर दुसरीकडे कोलकाता नाईट राईडर आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोनसंघापैकी एकाला घरचा रस्ता धरावा लागू शकतो. कारण राजस्थान राॅय़ल्स संघाने 11 सामने खेळत 6 गुण मिळवले तर चैन्नई सुपरकिंग्जने 10 सामने खेळून 4 गुण मिळवले आहेत. आता कोणता संघ कोणत्या स्थानावर हे आपण जाणून घेऊया.
आयपीएल पाॅईंट टेबल 2025
- पहिले स्थान - मुंबई इंडियन्स संघ 11 सामने खेळला असून या संघाने 7 सामने जिंकत 14 गुण प्राप्त केले आहे.
- दुसरे स्थान - आरसीबी संघाने 10 सामने खेळले असून 7 सामने जिंकत 14 गुण मिळवले
- तिसरे स्थान - पंजाब संघाने 10 सामने खेळले असून 6 सामने जिंकत 13 गुण मिळवले
- चौथे स्थान - गुजरात संघाने 9 सामने खेळले असून 6 जिंकत 12 गुण मिळवले
- पाचवे स्थान- दिल्ली संघाने 10 सामने खेळले असून 6 जिंकले या संघाचे 12 गुण झाले आहेत.
- सहावे स्थान- लखनऊ संघाने 10 सामने खेळत 5 जिंकले असून या संघाचे 10 गुण झाले आहेत.
- सातवे स्थान - कोलकाता नाईट रायडरने 10 सामने खेळले असून 4 जिंकत 9 गुण मिळवले
- आठवे स्थान - राजस्थान राॅयल संघाने 11 पैकी 3 सामने जिंकत 6 गुण मिळवले
- नववे स्थान- हैदराबाद संघाने 9 सामने खेळले असून 3 जिंकत 6 गुण मिळवले
- दहावे स्थान - चेन्नई सुपर किंग्जने 10 सामने खेळले असून 4 गुण मिळवत हा संघ सर्वात शेवटच्या म्हणजेच दहाव्या स्थानी आहे.












Click it and Unblock the Notifications