बुमराहच्या फिटनेस बद्दल पु्न्हा मोठी अपडेट, मुंबईच्या सलग तिसरा पराभवानंतर लवकरच संघात परतणार
Jasprit Bumrah Fitness Update : आयपीएल 2025 च्या 18 व्या सीझनमध्ये मुंबई इंडियन्स संघाची सुरुवात अत्यंत वाईट पध्दतीने झाली आहे. या सीझनमध्ये मुंबई इंडियन्सचा आतापर्यंत 4 सामन्यापैकी फक्त 1 सामना जिंकला आहे. तीन सामन्यात मुंबई इंडियन्सचा मोठा पराभव झाला आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाला त्यांचा सर्वात घातक गोलंदाज जसप्रीत बुमराहची उणीव भासत आहे.
भारताकडून बुमराह शेवटचा सामना 5 जानेवारी 2025 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला होता. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान त्याला पाठीला दुखापत झाली होती. त्यानंतर तो क्रिकेटपासून दूर आहे. आता बुमराहाच्या पुनरागमनाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

रिपोर्टनुसार बुमराह लवकरच मैदानात परतणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र तो मुंबई इंडियन्सच्या पुढील काही सामन्यांना मुकणार आहे. मध्यतरी अश्या काही बातम्या समोर आल्या होत्या की, बूमराह लवकरच मुंबई इंडियन्सच्या संघात परतणार आहे.
ESPNCricinfo च्या रिपोर्टनुसार बुमराह 7 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) विरुद्धच्या सामना खेळू शकणार नाही. रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, तो पूर्णपणे तंदुरुस्त होण्यापासून अजून काही दिवस दूर आहे. यावेळी बुमराह त्याच्या पुनरागमनाबाबत अधिक सावधगिरी बाळगत आहे. पूर्ण तंदुरुस्ती झाल्यानंरच त्याला आयपीएलमध्ये एंट्री मिळणार आहे. तसेच बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाकडून आयपीएल खेळण्यासाठी त्याला ग्रीन सिग्नल मिळण्याचीही वाट पाहावी लागणार आहे.
🚨 BUMRAH CLOSE TO RETURN. 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 4, 2025
- Jasprit Bumrah will miss MI's matches Vs LSG and RCB.
- He'll be soon taking the final rounds of fitness tests.
- Bumrah wants to be totally fit before returning to action. (Espncricinfo). pic.twitter.com/BRSRAXNCtl
दरम्यान काही दिवसांपुर्वीच मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी एक मोठी अपडेट दिली होती. जयवर्धनेने म्हटलं होतं की, स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अजूनही त्याच्या पाठीच्या दुखापतीतून बरा होत आहे. जसप्रीत बुमराह गेल्या काही आठवड्यांपासून बंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये राहत आहे. येथे तो वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे. बुमराहने आता गोलंदाजीचा सराव सुरू केल्याचा व्हिडीओ ही मागील आठवड्यात व्हायरल झाला होता.
जयवर्धने यांनी म्हटलं होत की, तो लवकर बरा होत आहे. मात्र बुमराहच्या पुनरागमनाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बुमराह मुंबई इंडियन्सच्या संघात 7 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात तो खेळू शकतो, असा अंदाज लावला जात आहे.मात्र आता मुंबई इंडियन्सला बुमराहसाठी अजून काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.












Click it and Unblock the Notifications