Ipl 2025 : मुंबई इंडियन्सला पाॅईंट टेबलमध्ये टॉपर होण्याची संधी! वाचा काय आहे नवे समीकरण? समजून घ्या
Ipl 2025 mumbai Indians : आयपीएल हंगामात प्ले-ऑफच्या लढतीसाठी आता गुजरात टायटन्स, मुंबई इंडियन्स,पंजाब किंग्ज आणि राॅयल चॅलेंजर बंगळुरूचा संघ सज्ज आहे. गुजरात जरी प्ले-ऑफमध्ये प्रवेश करणारी टीम ठरली तरीही साखळी फेरीत सलग दोन पराभव आणि राॅयल चॅलेंजर बंगळुरू संघाचाही एक पराभव त्यांना गुणतालिकेत खाली आणू शकतो आणि मुंबई इंडियन्सला गुणतालिकेत सर्वोच्च स्थानी जाण्याची संधी आहे.
आयपीएलच्या या हंगामात मुंबई इंडियन्सची सुरुवातीची कामगिरी निराशाजनक आणि खराब होती, यामुळे हार्दिक पंड्याचा संघ प्लेऑफमध्ये स्थान मिळवेल की नाही याची शाश्वती कुणीही देऊ शकत नव्हते, पण स्पर्धेच्या मध्यात मुंबई इंडियन्सच्या कामगिरीत सुधारणा झाली आणि मुंबईचा धुरंधर फलंदाज रोहित शर्माने काही शानदार अर्धशतकी खेळी खेळल्या, तसेच इतर खेळाडूंनीही आपापली कामगिरी उत्तमरित्या पार पाडली त्यामुळे मुंबईला अखेरच्या क्षणी प्ले-ऑफ अंतीम चार संघात स्थान मिळवता आले.

रोहित शर्मा व्यतिरिक्त, सूर्यकुमार यादव आणि गोलंदाजीत जसप्रित बुमराह यानेही धमाल केली. धावगती रोखण्यात यश मिळवत मुंबईच्या गोलंदाजांनी प्रतिस्पर्धी संघाला पाणी पाजले. या हंगामात सूर्या मुंबई इंडियन्सकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. मुंबई इंडियन्सने 13 सामन्यांत 8 विजय आणि 16 गुणांसह प्लेऑफमध्ये स्थान निश्चित केले आहे
'फायनल'साठी मुंबईला मोठी संधी
मुंबई इंडियन्स पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर राहिला तर त्यांना अंतिम फेरीत पोहोचण्याच्या दोन संधी मिळतील. अशा परिस्थितीत, मुंबई इंडियन्स त्यांचा उर्वरित एक सामना जिंकण्याचा प्रयत्न करावा लागेल. ही मोठी संधी त्यांना मिळणार आहे पण त्यासाठी त्याना आज पंजाब किंग्ज विरुद्ध होणारा सामना त्यांना जिंकावा लागणार आहे.
पंजाबसोबतचा महत्त्वाचा सामना
पंजाब किंग्ज सध्या पॉइंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे, जर आज पंजाबने मुंबईला हरवले तर ते वरच्या स्थानावर येईल आणि गुजरात खाली घसरेल. जरी गुजरात आणि मुंबईचे सारखेच गुण होतील तरीही मुंबई इंडियन्सला नेट रनरेटच्या आधारे वरच्या स्थानावर जाण्याची संधी आहे, यासाठी त्यांना आज पंजाबला हरवावे लागेल.
आयपीएलच्या नेट रन रेटमध्ये मुंबई अव्वल
आतापर्यंत गुजरातने 14 सामने खेळले असून त्यांचे 18 गुण झाले आहेत, परंतु नेट रन रेटच्या बाबतीत मुंबई इंडियन्स या हंगामात इतर सर्व संघांपेक्षा पुढे आहे. सध्या मुंबईचे गुण 16 आहे, आजचा पंजाबविरुद्ध सामना जिंकल्यास हा संघ नेट रनरेटच्या आधारे सर्वात वरच्या स्थानी येऊ शकेल पण त्यासाठी आरसीबीला लखनौविरुद्धचा सामना गमवावा लागला तरच. म्हणजेच एक मुंबईला आज पंजाबला हरवणे आणि लखनऊकडून आरसीबीचा पराभव होण्याची वाट पाहणे या दोन गोष्टी झाल्या तरच मुंबई सर्वोच्च स्थानी पोहचू शकते, जर आरसीबीने तो सामना जिंकला तर त्यांना 19 गुणांसह अव्वल स्थान मिळेल
आयपीएल पाॅईंट टेबल 2025 आज (IPL Point table 2025 today)
1 GT गुजरात टायटन्स - 13 सामने खेळले - 18 गुण
2 PBKS पंजाब किंग्ज 11 -13 सामने खेळले 17 गुण
3 RCB राॅयल चॅलेंजर बंगळुरू - 13 सामने खेळले 17 गुण
4 MI मुंबई इंडियन्स - 13 सामने खेळले 16 गुण
5 DC दिल्ली कॅपिटल्स - 14 सामने खेळले 15 गुण
6 SRH सन रायझर्स हैदराबाद - 14 सामने खेळले 13 गुण
7 LSG लखनऊ सुपर जायंट्स - 13 सामने खेळले 12 गुण
8 KKR कोलकाता नाईट रायडर 14 सामने खेळले 12 गुण
9 RR राजस्थान राॅयल्स 14 सामने खेळले 8 गुण
10 CSK चेन्नई सुपर किंग्ज 14 सामने खेळले 8 गुण












Click it and Unblock the Notifications