पंड्या भाई, सूर्या दादा, तर रोहित झाला भिडू ; जॅकी श्रॉफ झाले मुंबई इंडियन्सचे कोच, नेमकं झालं काय?
आयपीएलच्या इतिहासात मुंबई इंडियन्स हा संघ सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. या संघाने आत्तापर्यंत ५ वेळा विजेतेपद जिंकले आहे. गेल्यावेळी म्हणजेच, आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्सचा संघ कर्णधार हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली उतरला होता. मात्र त्यावेळी त्यांनी खूपच निराशाजनक कामगिरी केली होती. हा संघ पॉइंट टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर होता. आता झालं गेलं विसरून, हा संघ आयपीएल- २०२५ मध्ये एका नवीन सुरुवातीसाठी सज्ज झाला आहे. संघातील खेळाडूंमध्ये एकता वाढविण्यासाठी व नवीन ऊर्जा संचारण्यासाठी यंदाच्या हंगामाच्या अगोदर १० दिवस आधी, एमआयने ज्येष्ठ अभिनेते जाँकी श्राँफ यांना स्पिरिट कोच म्हणून नियुक्त केले आहे.

स्पिरिट कोच बनले ज्येष्ठ अभिनेते
मुंबई इंडियन्सने बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते जॉक श्रॉफ यांची स्पिरिट कोच म्हणून नियुक्ती केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये जॅकी त्याच्याच शैलीत संघाला प्रोत्साहन देताना दिसत आहे. जॅकी श्रॉफ हे मुंबईचेच आहेत त्याची बोलण्याची शैलीही पूर्णपणे मुंबईकरांसारखीच आहे. त्यामुळे ते संघात सामील झाल्यानंतर त्याच्या भाषणाचा आणि संवादाचा खेळाडूंवर सकारात्मक परिणाम होईल, अशी मुंबई इंडियन्सची अटकल आहे. श्रॉफ हे बऱ्याच काळापासून पर्यावरणासाठी काम करत आहेत आणि या व्हिडिओमध्येही त्यांच्या हातात एक लहान रोपटेही दिसत आहे.
'फॅब ५' केले लाँच
फॅब ४ किंवा फॅब ५ चा ट्रेंड आत्तापर्यंत फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येच ऐकायला मिळत होता. मात्र आयपीएल २०२५ च्या आधी, संघाने त्यांचा फॅब ५ लाँच केला आहे. संघातील सर्वात जुन्या आणि मोठ्या खेळाडूंना त्यात समाविष्ट करण्यात आले आहे आणि त्यांना वेगवेगळी नावे देण्यात आली आहेत. फॅब ५ मध्ये हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, रोहित शर्मा आणि तिलक वर्मा यांचा समावेश आहे. हे सर्व खेळाडू बऱ्याच काळापासून संघासोबत आहेत.
Saans le lamba & shaanti coz 𝙅𝘼𝙂𝙂𝙐 𝘿𝘼𝘿𝘼 - aapla Spirit Coach is here! 🧘♂️😎#MumbaiIndians #PlayLikeMumbai pic.twitter.com/md5fnlJKX9
— Mumbai Indians (@mipaltan) March 13, 2025
खेळाडूंना दिली मुंबईकर नावे
फॅब ५ च्या खेळाडूंना जॅकी श्रॉफ यांच्या चित्रपटांमध्ये स्पिरिट कोच असलेली नावे दिली आहेत किंवा त्यांचे संवादही तेच आहेत. हार्दिक पंड्याचे नाव भाई, सूर्याचे नाव दादा, बुमराहचे नाव बॉस, तिलकचे नाव बंटी आणि रोहित शर्माचे नाव भिडू असे ठेवण्यात आले आहे. भिडू हा श्रॉफचा सर्वात लोकप्रिय शब्द आहे.












Click it and Unblock the Notifications