Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Video! धीरगंभीर धोनी 'एवढं' खळखळून का हसला? विराट कोहलीने असा कोणता जोक मारला? वाचा डिटेल्स

आयपीएलच्या काल झालेल्या सामन्यांत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा ५० धावांनी पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला. हा विजय विशेष होता, कारण १७ वर्षांनंतर पहिल्यांदाच चेपॉक स्टेडियमवर आरसीबीने सीएसकेला हरवण्यात यश मिळवले होते. याच सामन्यांत अजून एका गोष्टीची चर्चा झाली, ती म्हणजे धोनीच्या खळखळून हास्याची... मैदानावर किंवा मैदानाबाहेर कायम धीरगंभीर असलेला धोनीचे हे मनमोकळे हास्य, सहसा कुठे दिसत नाही. मात्र विराट कोहली सोबत असेल तर असे हलकेफुलके विनोद नेहमी होतात. असाच प्रकार या सामन्यांत झाला.

Dhoni s laughing video

नेमके काय झाले?

चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील सामन्यानंतर एक खास आणि मनोरंजक दृश्य पाहायला मिळाले. चेन्नईचा खेळाडू वंश बेदीने भारतीय क्रिकेटमधील दोन दिग्गज खेळाडू एमएस धोनी आणि विराट कोहली यांच्यासोबत फोटो काढण्याचा हट्ट धरला. त्यानंत वंश बेदीला मधोमध उभे करुन उजव्या बाजूला कोहली तर डाव्या बाजूला एमएस धोनी उभे राहिले. मात्र फोटो काढताना कोहली थोडासा म्हाताऱ्या माणसासारखा वाकला आणि वंश बेदीने काहीतरी टिपण्णी केली. ही टिपण्णी धोनीला एवढी आवडली की, त्याने खो-खो हसायला सुरुवात केली. धोनीच्या याच मनमोकळ्या हास्याचा व्हिडीओ सीएसकेने व्हायरल केला.

जोकचे कारण काय?

वंश बेदी आणि धोनीसोबत फोटो काढत असताना विराट कोहली थोडासा खाली वाकला. वंश बेदीची उंची खूप कमी आहे. कदाचित, त्यामुळे विराट कोहलीने थोडा खुजा होण्याची गंमत केली असावी. या प्रकाराने विराट कोहली हा धोनी आणि वंशपेक्षा लहान दिसू लागला. त्यानंतर वंशने हसून कोहलीला व्यवस्थित उभे राहण्यास सांगितले. यावेळी वंशने काहीतरी वेगळे वाक्य उच्चारले. वंशच्या याच मजेदार टिप्पणीवर धोनी मोठ्याने हसला. कोहलीलाही हा हलकाफुलका विनोद आवडला. हा अनोखा आणि मनोरंजक क्षण कॅमेऱ्यात कैद झाला. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. ज्यामुळे चाहते खूप आनंदी झाले.

सीएसकेने मिळवला विजय

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा ५० धावांनी पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला. आरसीबीची फलंदाजी उत्कृष्ट झाली. कर्णधार रजत पाटीदारने ५१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली करत संघाला १९६ धावापर्यंत नेऊन ठेवले. प्रत्युत्तरादाखल, चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात खराब झाली. कारण त्यांनी पहिल्या दोन षटकात दोन विकेट गमावल्या. जोश हेझलवूडने शानदार गोलंदाजी करत ऋतुराज गायकवाड आणि राहुल त्रिपाठी यांना शून्यावर बाद केले, ज्यामुळे सीएसकेवर दबाव निर्माण झाला आणि त्यांचा पराभव झाला.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+