धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा, केला 'हा' विक्रम; त्याच्या आसपासही कुणी नाही, काय केलं वाचा
इंडियन प्रीमियर लीग- २०२५ च्या आठव्या सामन्यात शुक्रवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने चेन्नई सुपर किंग्जचा ५० धावांनी पराभव केला. घरच्या मैदानावर २००८ नंतर चेन्नईचा पहिल्यांदाच पराभव झाला. सीएसके हा सामना हारला असला तरी, दिग्गज खेळाडू महेंद्रसिंग धोनीने या सामन्यांत एक नवा विक्रम आपल्या नावावर केला. सीएसकेसाठी आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा सुरेश रैनाचा विक्रम धोनीने मोडला.

धोनीने काय केले?
आरसीबीविरुद्धच्या सामन्यात धोनी अशा वेळी खेळायला आला ज्यावेळी तो सीएसकेला जिंकून देऊ शकत नव्हता. मात्र तरीही त्याने १६ चेंडूत ३० धावांची खेळी केली. या ३० धावांच्या बळावर धोनीने आयपीएलमध्ये सीएसकेसाठी ४६९९ धावा पूर्ण केल्या. त्याने २३६ सामन्यांमध्ये हा टप्पा गाठला. यापूर्वी सीएसकेकडून खेळताना सुरेशने १७६ सामन्यांमध्ये ४६८७ धावा केल्या आहेत. सीएसकेकडून खेळताना सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम सुरेश रैनाच्या नावावर होता. मात्र धोनीने या सामन्यांत तो मोडला. सीएसकेकडून खेळताना धोनीने एकूण २२ अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सरासरी ४०.५० आणि स्ट्राईक रेट १३९.४३ आहे.
सीएसकेचे टाॅप ५ फलंदाज
धोनी आणि रैना नंतर सीएसकेसाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये फाफ डू प्लेसिस तिसऱ्या क्रमांकावर आहे. डू प्लेसिसने या फ्रँचायझीसाठी एकूण ९२ सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने २७२१ धावा केल्या आहेत. याशिवाय संघाचे सध्याचे कर्णधार ऋतुराज गायकवाड यांनी ६८ सामन्यांमध्ये २४३३ धावा केल्या आहेत. टॉप पाच खेळाडूंच्या यादीत, रवींद्र जडेजाने १७४ सामन्यांमध्ये १९३९ धावा केल्या आहेत.
सीएसकेसाठी सर्वाधीक धावा
एमएस धोनी- ४६९९ धावा (२०४ डाव)
सुरेश रैना- ४६८७ धावा (१७१ डाव)
फाप डू प्लेसिस- २७२१ धावा (८६ डाव)
ऋतूराज गायकवाड- २४३३ धावा (६७ डाव)
रवींद्र जडेजा १९३९ धावा (१२७ डाव)
कसा झाला सीएसकेचा पराभव
आरसीबी आणि सीएसके या सामन्यात कर्णधार रजत पाटीदारच्या संघाने प्रथम फलंदाजी करत निर्धारित २० षटकांत ७ गडी गमावून १९६ धावा केल्या. पाटीदार यांनी स्वतः त्यांच्या संघासाठी ३२ चेंडूत ५१ धावांची दमदार खेळी केली. प्रत्युत्तरात, लक्ष्याचा पाठलाग करताना सीएसकेला २० षटकांत ८ गडी गमावून केवळ १४६ धावा करता आल्या.












Click it and Unblock the Notifications