IPL 2025 : 2 षटके अन् 11 कोटी 75 लाख वसूल, 4 विश्वचषक जिंकणाऱ्या खेळाडूने घातला कहर!
IPL 2025, DC Vs RR, कोणत्याही वेगवान गोलंदाजासाठी 12 पैकी 12 चेंडूंवर योग्य लाईन आणि लेन्थसह यॉर्कर टाकणे किती कठीण असते हे सर्वांना माहिती आहे. तेही जेव्हा तुम्ही आयपीएल सारख्या स्पर्धेत जिथे फलंदाजांचे वर्चस्व असते, अशा खेळात यॉर्कर टाकणे खूप अवघड असते. एव्हाना ते शक्यच नाही, असे बोलले जाते. पण, होय हा अजूबा घडलाय.
परंतु, आयपीएलच्या बुधवारी झालेल्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध दिल्ली कॅपिट्लस थरारक सामन्यात मिचेल स्टार्कने त्याच्या संघाला दिल्ली कॅपिटल्सला जवळजवळ हरवलेला सामना जिंकवून दिला. आयपीएल 2025 च्या पहिल्या सुपर ओव्हरमध्ये राजस्थान रॉयल्सला एकट्याने गुडघे टेकायला लावले.

पहिल्या 20 व्या षटकात 9 धावा वाचल्या
ऑस्ट्रेलियासाठी चार विश्वचषक जिंकणाऱ्या मिचेल स्टार्कने (2015 एकदिवसीय विश्वचषक, 2021 टी-20 विश्वचषक, 2023 एकदिवसीय विश्वचषक, 2023 जागतिक कसोटी अजिंक्यपद) 16 एप्रिलच्या रात्री अरुण जेटली स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सविरुद्ध इतक्या अचूक यॉर्कर टाकल्या की प्रेक्षक थक्क झाले.
या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा विजय जवळजवळ निश्चित होता. मिशेल स्टार्कच्या शेवटच्या षटकात राजस्थान रॉयल्सला विजयासाठी फक्त नऊ धावांची आवश्यकता होती. परंतु डावखुरा वेगवान गोलंदाजाने फक्त 8 धावा दिल्या आणि सामना सुपर ओव्हरमध्ये जाऊन पडला.
सुपर ओव्हरमध्ये देखील 11 धावा दिल्या
सुपर ओव्हरमध्ये मिशेल स्टार्क गोलंदाजी करत असताना शिमरॉन हेटमायर (06) आणि रियान पराग (04 ) रॉयल्सकडून फलंदाजीसाठी आले. इथेही स्टार्कने सहाही चेंडूत सहा यॉर्कर टाकले, त्यापैकी एक हेटमायरने आणि एक परागने मारला, पण पराग फ्री हिटवर धावबाद झाला. त्यानंतर यशस्वी जयस्वाल (00) धावबाद झाला आणि दिल्लीसमोर 12 धावांचे लक्ष्य ठेवले.
11.75 कोटींची झाली वसूली, स्टार्क बनला विजयाचा शिलेदार
दिल्लीकडून केएल राहुल (नाबाद 7) आणि ट्रिस्टन स्टब्स (नाबाद 6) फलंदाजीला आले. तर रॉयल्सकडून संदीप शर्मा गोलंदाज होता. राहुलने पहिल्या चेंडूवर दोन धावा घेतल्या आणि पुढच्या चेंडूवर चौकार मारला. स्टब्सने चौथ्या चेंडूवर षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला.
मेगा लिलावापूर्वी कोलकाता नाईट रायडर्सने मिचेल स्टार्कला रिलीज केले होते. त्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने त्याला 11 कोटी 75 लाख रुपयांना खरेदी केले. यापूर्वी, तो केकेआरशी 24.75 कोटी रुपयांच्या विक्रमी बोलीसह जोडला गेला होता. परंतु, काल झालेल्या सामन्यात मिचेल स्टार्कने जी कामगिरी केली, त्यावरुन पावने बारा कोटी रुपये वसूल झाले, अशी भावना दिल्ली कॅपिटल्स संघाच्या मालकाची होती.












Click it and Unblock the Notifications