Video : बुमराहला ठोकले, रवी बिश्नोईचा जल्लोष पाहून ऋषभ पंत अन् झहीर खानलाही हासू आवरले नाही
IPL 2025 MI vs LSG Ravi Bishnoi : आयपीएल 2025 मधील 27 एप्रिलची संध्याकाळ मुंबई इंडियन्सची असली तरी. पण पराभवानंतरही, लखनौ सुपर जायंट्सचा फिरकीपटू रवी बिश्नोईला रात्री आनंदामुळे झोप लागली नसेल. तुम्ही म्हणाल की, कशाचा आनंद, संघाचा तर पराभव झालाच की.
पण रवी विश्नोईने जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर षटकार मारला अन् त्याचा आनंद गगनात मावेनासा झाला. त्याने जो मैदानावर आनंद साजरा केला. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, दुसरे म्हणजे ऋषभ पंत अन् चक्क जहीर खान यांना देखील त्याचा आनंद पाहून हासू आवरले नाही.

नेमकं काय झालं?
वानखेडे स्टेडियमवर काल मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात सामना रंगला. लखनऊची बॅटिंग चालू झाली. यात लेग स्पिनने फलंदाजांना कसे गुरफुटून टाकायची याची जादू असलेला सडपातळ रवी बिश्नोईने जेव्हा बॅट हाती घेतली अन् जगातील सर्वात फास्ट बॉलर बुमराहला षटकार मारला. 18 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर 76 मीटर लांब षटकार मारल्यानंतर त्यांचा आनंद काही गगनाव मावेनासा झाला. तो एकदा खूश झाला की, त्याचा व्हिडिओ सद्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रवी बिश्नोई इतका आनंदी झाल्याचे पाहायला मिळाले की, जणू काही त्याने षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला. बुमराहने लेंथ बॉल टाकला आणि रवी बिश्नोईने लोफ्टेड शॉट मारून सहा धावा काढल्या. बुमराहविरुद्ध षटकार मारल्यानंतर बिश्नोई केवळ आनंदी नव्हता तर डगआउटमध्ये बसलेल्या लखनौचा कर्णधार ऋषभ पंत आणि झहीर खानची देखील प्रतिक्रिया तितकीच बोलकी होती.
Bishnoi reaction after hitting a six against Bumrah 😭😭😭 pic.twitter.com/9A1Vav4EwT
— (@FourOverthrows) April 27, 2025
व्हिडिओ झाला व्हायरल?
जसप्रीत बुमराहलाही रवी बिश्नोईने षटकार मारला यावर विश्वास बसत नव्हता. कारण, त्याची प्रतिक्रिया देखील पाहण्यासारखी होती. दुसरीकडे, रवी बिश्नोईच्या सेलिब्रेशनची आणि पंतच्या प्रतिक्रियेची क्लिप चाहत्यांनी इंस्टाग्रामवर शेअर केली आणि काही वेळातच तो प्रचंड व्हायरल झाली. रवी बिश्नोईने सामन्यात 14 चेंडूत 13 धावा केल्या. तो बाद होणारा नववा फलंदाज होता.
सामन्याविषयी घ्या जाणून?
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, मुंबईने प्रथम फलंदाजी करत 215 धावा केल्या आणि नंतर 20 षटकांत एलएसजीला 161 धावांवर गुंडाळून यशस्वीरित्या धावसंख्या वाचवली. एमआयकडून जसप्रीत बुमराहने चार षटकांत 22 धावा देत 4 विकेट्स घेतल्या आणि ट्रेंट बोल्टने एलएसजीच्या तीन फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. त्याआधी सूर्यकुमार यादव आणि रायन रॅकेलटन यांनी अर्धशतके झळकावली होती.












Click it and Unblock the Notifications