आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात दमदार एंट्री करणाऱ्या 'या' खेळाडूने नीता अंबानींचे घेतले दर्शन; VIDEO
ipl 2025 MI bowler vignesh puthur : आयपीएल 2025 मधील तिसरा सामना काल रविवारी दि.23 मार्च रोजी मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात झाला. यात सीएसके एमआय संघाचा पराभव केला.
या सामन्यात आयपीएलमध्ये पदार्पण करणारा 24 वर्षीय विघ्नेश पुथूरचे सामन्यानंतर संघाने कौतुक केले. फिरकी गोलंदाजाने सीएसकेविरुद्ध केलेल्या प्रभावी स्पेलचे फ्रँचायझी मालक नीता अंबानी यांनी कौतुक केले.
तरुण फिरकी गोलंदाजाने त्याच्या पदार्पणाबद्दल तसेच ऋतुराज-गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील सीएसकेविरुद्धच्या मुंबईच्या सामन्याबद्दल आपले विचार मांडले. नीता अंबानी यांनी विघ्नेशचे कौतुक करून त्याला खास भेट देखील दिली. यावेळी विघ्नेशने नीता अंबानी यांचे दर्शन घेतले. ड्रेसिंग रुममधील हा व्हिडिओ एमआयच्या वतीने ट्विटर हॅंडलवर शेअर करण्यात आला आहे.

नीता अंबानी यांनी विघ्नेश पुथूरचा केला सन्मान
रविवारी मुंबई इंडियन्सच्या ड्रेसिंग रूममध्ये, फ्रँचायझी मालक नीता अंबानी यांनी विघ्नेश पुथूरला त्याच्या शानदार आयपीएल पदार्पणानंतर विशेष बक्षीस दिले. केरळमधील फिरकी गोलंदाजाला संघाच्या सामन्यातील सर्वोत्तम गोलंदाज म्हणून घोषित करण्यात आले. नीता अंबानी यांनी त्याला एक खास पिन भेट दिली, जी त्यांनी विघ्नेशच्या किटवर लावली. त्यानंतर पुथूरने भाषण देऊन समारोप केला आणि त्याने संधीसाठी फ्रँचायझीचे आभार मानले. त्याने कर्णधार सूर्यकुमार यादव यांचेही पाठिंब्याबद्दल आभार मानले, ज्यामुळे तो सामन्यादरम्यान दबावमुक्त राहू शकला.
Local Kerala talent ➡️ MI debut in a big game ➡️ Wins the Dressing Room Best Bowler 🏅
— Mumbai Indians (@mipaltan) March 24, 2025
Ladies & gents, Vignesh Puthur! ✨#MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL #CSKvMI pic.twitter.com/UsgyL2awwr
काय म्हणाला विघ्नेश पुथूर?
"मला सामना खेळण्याची संधी दिल्याबद्दल मी एमआय फ्रँचायझीचे आभार मानू इच्छितो. मी माझ्या आयुष्यात कधीच विचार केला नव्हता की मी या सर्व खेळाडूंसोबत खेळेन. मी खूप आनंदी आहे. आज आपण जिंकू शकलो असतो. खूप खूप धन्यवाद, टीम. तसेच, आमचा कर्णधार. सूर्या भाई खूप पाठिंबा देत होते. म्हणूनच मला कधीही इतका दबाव जाणवला नाही. मला पाठिंबा दिल्याबद्दल धन्यवाद," असे विघ्नेश पुथूर यांनी मुंबई इंडियन्सने 'एक्स' वर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे.












Click it and Unblock the Notifications