Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL 2025: मेगा लिलावाच्या वेळत मोठा बद्दल, वेळ का बदलली , लिहून ठेवा नवीन टाइम

IPL 2025 mega auction live streaming details: IPL 2025 मेगा लिलावासाठी लिलावाची वेळ आधी भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता निश्चित करण्यात आली होती. मात्र आता लिलावाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. आता लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होईल.

लिलावाच्या वेळात बद्दल

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) चा मेगा लिलाव 2 दिवसांनंतर सुरू होईल. परंतु यावेळी लिलावाची वेळ थोडी बदलली आहे. आधी ती दुपारी 3 वाजता सुरू होणार होती, पण आता ती भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजता सुरू होईल. हा बदल नुकताच जाहीर करण्यात आला असून आता सर्व संघ आणि खेळाडूंना या नवीन मुदतीनुसार तयारी करावी लागणार आहे.

ipl 2025 mega auction

अखेर वेळ का बदली?

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर मालिकेतील पहिला कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून सुरू झाला आहे. IPL मेगा लिलाव देखील 24-25 नोव्हेंबर रोजी आयोजित केला जाणार आहे. दरम्यान या दोन महत्त्वाच्या कार्यक्रमांच्या वेळ एकत्र येण्याची भीती प्रसारकांना होती. विशेषत पर्थ कसोटी सामन्याच्या वेळेच्या मर्यादेमुळे खराब प्रकाश आणि स्लो ओव्हररेट यासारख्या समस्या उद्भवू शकतात, ज्यामुळे सामन्याची वेळ वाढू शकते.

पर्थ कसोटी आणि आयपीएल मेगा लिलाव वेळची होणारी अडचण सोडवण्यासाठी प्रसारकांनी सुचवले की कसोटी सामन्याच्या दिवसातील खेळ अर्ध्या तासाने वाढवावा. या निर्णयामुळे केवळ आयपीएल लिलावाच्या वेळेवरच परिणाम होणार नाही. तर संपूर्ण कसोटी सामन्याचे प्रक्षेपण योग्य प्रकारे होऊ शकेल. सौदी अरेबियातील जेद्दाह येथे हा लिलाव होणार आहे. यामध्ये 574 खेळाडूंची नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत.

574 खेळाडूंची निवड

IPL 2025 च्या मेगा लिलावाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. जोफ्रा आर्चरचा 575 वा खेळाडू म्हणून लिलावात समावेश होण्याची अपेक्षा आहे. आयपीएल 2025 मेगा लिलावात 574 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे, त्यापैकी 366 भारतीय आणि 208 परदेशी खेळाडू आहेत. हा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे होणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+