IPL 2025: निकोलन पूरनने रचला इतिहास; ख्रिस गेलच्या पंक्तीत मिळवले स्थान, नेमके काय केले? वाचा
विशाखापट्टणम येथील डाॅ. वायएस राजशेखर रेड्डी मैदानावर आयपीएलचा पाचवा सामना सुरु आहे. आज लखनऊ सुपर जायंट्स व दिल्ली कॅपिटल यांच्यात लढत होत आहे. या सामन्यांत एलएसजीचा स्टार फलंदाज निकोलस पूरन याने एक विक्रम आपल्या नावे केला. आयपीएलच्या आजच्या सामन्यात टी- २० सामन्यांत ६०० षटकार मारणारा तो चौथा फलंदाज ठरला.

पूरनचे ६०० षटकार
दिल्ली कॅपिटल विरूद्धच्या सामन्यांत आपले ६०० षटकार पूर्ण करण्यासाठी पूरनला फक्त एका षटकाराची आवश्यकता होती. डावाच्या सातव्या षटकांत त्याने विप्रज निमजच्या तिसऱ्या चेंडूवर गगनचुंबी षटकार मारत आपले ६०० षटकार पूर्ण केले. पूरनने ३८५ टी-२० सामन्यांमध्ये ६०० षटकार मारण्याची किमया साध्य केली. त्याने लखनौ सुपर जायंट्ससाठी खेळताना ३० आयपीएल सामन्यांमध्ये आतापर्यंत ६५ षटकार मारले आहेत.
सर्वाधिक षटकार कुणाचे
टी-२० मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल याच्या नावावर आहे. आपल्या १७ वर्षांच्या टी-२० कारकिर्दीत गेलने ४६३ सामने खेळले आणि १०५६ षटकार मारले. त्याच्यानंतर किरॉन पोलार्ड (६९५ सामन्यांमध्ये ९०८ षटकार) आणि आंद्रे रसेल (५३९ सामन्यांमध्ये ७३३ षटकार) यांचा क्रमांक लागतो.
सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
ख्रिस गेल - १०५६
किरॉन पोलार्ड - ९०८
आंद्रे रसेल - ७३३
निकोलस पूरन - ६००*
अॅलेक्स हेल्स - ५५२
कॉलिन मुनरो - ५५०
ग्लेन मॅक्सवेल - ५२९
रोहित शर्मा - ५२५
जोस बटलर - ५१५
डेव्हिड मिलर - ५०२
पूरनला २१ कोटींना घेतले
आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी लखनौस्थित फ्रँचायझीने पूरनला २१ कोटी रुपयांना राखून ठेवले होते. आजच्या सामन्यात पूरन तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला. ११ षटकांच्या शेवटी तो २० चेंडूत ४१ धावा देऊन फलंदाजी करत होता. २०२३ च्या हंगामापासून आयपीएलमध्ये एलएसजी सेट-अपचा भाग असलेल्या पूरनने आतापर्यंत चार चौकार आणि तीन षटकार मारले आहेत. त्याने मिशेल मार्शसोबत दुसऱ्या विकेटसाठी फक्त ३८ चेंडूत ७९ धावा जोडल्या आहेत. ऑस्ट्रेलियन टी२० कर्णधार ३३ चेंडूत सहा चौकार आणि पाच षटकारांसह ६५ धावा करत आहे.












Click it and Unblock the Notifications