IPL 2025 मधील पहिल्या सामन्याच्या पूर्वीच LSGने केला मोठा बदल, 'या' गोलंदाजाला दिली थेट एंट्री
IPL 2025, LSG, Shardul Thakur News : आयपीएल 2025 मधील पहिल्या सामन्यापूर्वी लखनऊ सुपर जायंट्सने संघात मोठा बदल केला आहे. संघाचा गोलंदाज मोहसीन खान दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर आहे. त्यामुळे शार्दुल ठाकूरला त्याच्या जागी संधी देण्यात आली आहे. चला तर जाणून घेऊया शार्दूल ठाकूरविषयी, त्याच्या कुटुंबाविषयी आणि नजर टाकूया त्याच्या क्रिकेट करियरवर, वाचा सविस्तर.
शार्दुलचा आतापर्यंतचा रेकॉर्ड चांगला आहे. पण आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात तो विकला गेला नाही. आता लखनऊने त्याला बेस प्राईसवर संघात समाविष्ट केले आहे. आयपीएलने त्यांच्या अधिकृत वेबसाइटद्वारे शार्दुलबद्दल माहिती शेअर केली होती. त्यामुळे शार्दूल आजच्या पहिल्या डावात संधीचे किती सोने खरेल हे पाहावे लागणार आहे.

डावखुरा वेगवान गोलंदाज मोहसीन खान दुखापतीमुळे त्रस्त आहे. या हंगामात तो एकही सामना खेळू शकणार नाही. म्हणून संघाने शार्दुलला करारबद्ध केले आहे. शार्दुलची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. तो एक अनुभवी वेगवान गोलंदाज आहे. या हंगामात लखनऊचा पहिला सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध आहे. हा सामना आज 24 मार्च रोजी खेळला जाणार आहे. लखनऊ संघ ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे.
आयपीएलमध्ये शार्दुलची काय आहे कामगिरी
शार्दुलने आयपीएलमध्ये आतापर्यंत 94 विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल 2021 त्याच्यासाठी खूप चांगले होते. या हंगामात शार्दुलने 16 सामन्यांमध्ये 21 विकेट्स घेतल्या होत्या.
तर 2020 मध्ये त्याने 10 विकेट्सही घेतल्या होत्या. शार्दुलने 2015 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. शार्दुल पाच आयपीएल संघांसाठी खेळला आहे. तो चेन्नई सुपर किंग्ज, कोलकाता नाईट रायडर्स, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि रायझिंग पुणे सुपरजायंट्सकडून खेळला आहे.
शार्दूलला क्रिकेटची कशी लागली आवड
शार्दुल ठाकूरला लहानपणापासूनच क्रिकेटमध्ये रस होता. त्याचे घर मुंबईपासून सुमारे 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या पालघरमध्ये होते. सुरुवातीला शार्दुल दररोज सकाळी सरावासाठी मुंबई लोकल ट्रेनने जायचा. नंतर, त्याच्या प्रतिभेने प्रभावित होऊन, त्याचे प्रशिक्षक दिनेश लॉड यांनी त्याला त्याच्या घरी राहण्यास सांगितले.
मग शार्दुल तिथेच राहिला आणि अभ्यासासोबत क्रिकेटचे प्रशिक्षण घेऊ लागला. 2006 मध्ये, एका शालेय क्रिकेट सामन्यात, त्याने सहा चेंडूत सहा षटकार मारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला त्याचे वजन सुमारे 83 किलो होते. माजी भारतीय क्रिकेटपटू झहीर खानने त्याला वजन कमी करण्याचा सल्ला दिला.
शार्दुलने ही सूचना मनापासून स्वीकारली आणि काही महिन्यांतच 83 किलोवरुन 70 किलो वजन कमी केले. त्याने 13 किलो वजन कमी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यानंतर शार्दुलला मुंबईच्या रणजी संघात खेळण्याची संधी मिळाली.
शार्दुलचे लग्न कधी झाले?
27 फेब्रुवारी 2023 रोजी, भारतीय क्रिकेटपटू शार्दुल ठाकूरने त्याची दीर्घकाळची मैत्रीण मिताली पारुळकरसोबत लग्नगाठ बांधली. दोघांचेही लग्न मुंबईत मराठी रितीरिवाजानुसार झाले. बराच काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर काही जवळच्या पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघांनीही अतिशय खाजगी पद्धतीने लग्न केले. आम्ही तुम्हाला सांगतो की शार्दुलची पत्नी मिताली पारुळकर ही एक व्यावसायिक महिला आहे. ती "ऑल द जाझ-लक्झरी बेक्स" ची संस्थापक आहे. ही एक बेकरी आहे जी कस्टमाइज्ड आणि स्पेशल केक बनवते.
-
"गणेश नाईकांना शिवसेना संपवण्याची परवानगी द्याच, आम्हीही बघतोच"; शिंदेंच्या खासदारांचे भाजपला आव्हान -
Ajit Pawar Plane Accident : अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला? लँडिंगवेळी काय घडलं? -
अजित दादांच्या निधनावर CM फडणवीसांची भावूक प्रतिक्रीया; राज्यात एक दिवस सुट्टी, 3 दिवस दुखवटा जाहीर -
अदानी समूह आणि 'एम्ब्रेअर' भारतात उभारणार विमानांची फॅक्टरी; 'मेक इन इंडिया'ला मोठे बळ -
मुंब्रा कुणाच्या बापाचा नाही, तो तिरंग्याचाच राहणार!; सहर शेखला आव्हाडांचे कडक प्रत्युत्तर -
अजित पवारांसोबत विमान अपघातात मृत्यू झालेली पिंकी माळी कोण?, शिक्षण, गाव ते दादांच्या संपर्कात कशी? -
Ajit Pawar Passes Away : विमान अपघातानंतर अजित पवारांची ओळख कशी पटली? काय काय सापडलं.. -
'ही सकाळ सुन्न करणारी' अजित पवारांच्या निधनावर महेश लांडगे यांची भावूक पोस्ट -
भारत-EU ऐतिहासिक व्यापार करार; 'मदर ऑफ ऑल डील्स'वर शिक्कामोर्तब! या वस्तू होणार स्वस्त! -
मोठी बातमी: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला बारामतीत भीषण अपघात; प्रकृती गंभीर -
पायलटचा तो शेवटचा 'मेसेज' आणि काळजाचा ठोका चुकवणारा अपघात, विमानात तांत्रिक बिघाड,घटनेची चौकशी होणार -
कंटाळा की नव्या गायकांना संधी? का सोडलं अरिजीतने प्लेबॅक सिंगिंग; खुद्द गायकानेच सांगितलं खरं कारण











Click it and Unblock the Notifications