Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL सुरु होण्यापूर्वीच KKR संघाला मोठा धक्का; 'हा' फास्टर बॉलर संघातून गेला बाहेर, नेमकं कारण काय

IPL 2025 : आयपीएल 2025 सुरू होण्यापूर्वीच कोलकाता नाईट रायडर्सला मोठा धक्का बसला आहे. फास्टर बॉलर उमरान मलिक हा केकेआर टीममधून बाहेर पडला आहे. तो काही दिवसांपासून दुखापतीमुळे त्रस्त असल्याने अखेर त्याला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. त्याच्या जागी केकेआरने डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन सकारियाला संघात समाविष्ट केले आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या हंगामासाठी म्हणजेच आयपीएल 2025 साठी कोलकाता नाईट रायडर्सने उमरान मलिकच्या जागी चेतन सकारियाची निवड केली आहे. उमरान मलिक दुखापतीमुळे संपूर्ण हंगामाबाहेर आहे. केकेआरनेच ही माहिती दिली आहे.

चेतन सकारिया यांनी भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले आहे. सकारियाने एक एकदिवसीय आणि दोन टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याने 19 आयपीएल सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 20 विकेट्स घेतल्या आहेत. डावखुरा वेगवान गोलंदाज चेतन सकारियाला 75 लाख रुपयांमध्ये संघात स्थान देण्यात आले आहे.

IPL 2025

चेतन सकारिया यांनी भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले असले तरी, आयपीएल 2025 मध्ये त्यांना कोणताही खरेदीदार मिळाला नाही. यानंतर साकारिया कोलकाता नाईट रायडर्स संघात नेट बॉलर म्हणून सामील झाला. आता केकेआरने उमरान मलिकच्या जागी त्याला संघात समाविष्ट केले आहे.

केकेआर आयपीएलचा पहिला सामना खेळणार!

आयपीएल 2025 ची सुरुवात 22 मार्चपासून सुरू होणार आहे. 18 व्या हंगामातील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. 22 मार्च रोजी केकेआरचा सामना आरसीबीशी होईल. हा सामना केकेआरच्या होम ग्राउंड ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. या हंगामात केकेआरची कमान अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आली आहे. यावेळी कोलकाता नाईट रायडर्स संघात काही नवीन खेळाडू आले आहेत.

कोलकाता नाईट रायडर्सचा संभाव्य प्लेइंग 11

क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), अजिंक्य रहाणे, वेंकटेश अय्यर, अंगकृष रघुवंशी, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, आंद्रे रसेल, सुनील नारायण, हर्षित राणा, अँरिच नोर्टजे/स्पेंसर जॉन्सन आणि वरुण चक्रवर्ती.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+