मुंबई इंडियन्सचा सलग दोन सामन्यात पराभव झाल्यानंतर, बुमराहची एंट्री होणार ? व्हिडीओ होत आहे व्हायरल

Jasprit Bumrah Fitness Update : आयपीएल 2025 च्या 18 व्या सीझनमध्ये मुंबई इंडियन्स संघाची सुरुवात अत्यंत वाईट पध्दतीने झाली आहे. या सीझनमध्ये मुंबई इंडियन्सचा आतापर्यंत दोन्ही सामन्यात पराभव पराभव झाला आहे. मुंबई इंडियन्सला त्यांचा सर्वात घातक गोलंदाज जसप्रीत बुमराहची उणीव भासत आहे. भारताकडून बुमराह शेवटचा सामना 5 जानेवारी 2025 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला होता. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान त्याला पाठीला दुखापत झाली होती. त्यानंतर तो क्रिकेटपासून दूर आहे.

मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी शुक्रवारी एक मोठी अपडेट दिली होती. जयवर्धने ने म्हटलं आहे की, की स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अजूनही त्याच्या पाठीच्या दुखापतीतून बरा होत आहे. या पार्श्वभूमीवर आता मुंबई इंडियन्ससाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. कारण बुमराहने आता गोलंदाजीचा सराव सुरू केला आहे.

jasprit bumrah

जसप्रीत बुमराह गेल्या काही आठवड्यांपासून बंगळुरूमधील बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये राहत आहे. येथे तो वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली आहे. दरम्यान बुमराहने नेटमध्ये गोलंदाजीचा सराव सुरू केल्याची एक नवीन अपडेट आली आहे. बुमराह अजूनही बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये आहे.
एमआयच्या मुख्य प्रशिक्षकांनी बुमराहच्या फिटनेसबद्दल अपडेट दिले.

मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबद्दल अपडेट दिले होते. जयवर्धने यांनी म्हटलं होत की, तो लवकर बरा होत आहे. मात्र बुमराहच्या पुनरागमनाची तारीख अद्याप निश्चित झालेली नाही. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात बुमराह मुंबई इंडियन्सच्या संघात सामील होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. 7 एप्रिल रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात तो खेळू शकतो, असा अंदाज लावला जात आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+