Jasprit Bumrah Net Worth: बुमराह आयपीएलमध्ये एंट्री करणार ? जाणून घ्या एकूण संपत्ती आणि कार कलेक्शन
Jasprit Bumrah Net Worth: टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह त्याच्या घातक यॉर्कर आणि आक्रमक गोलंदाजीसाठी ओळखला जातो. चाहते आयपीएल 2025 मध्ये त्याच्या पुनरागमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत, परंतु त्याच्या खेळण्याबद्दल अजूनही सस्पेन्स कायम आहे.
अशा परिस्थितीत बुमराची एकूण संपत्ती, त्याचे उत्पन्नाचे मुख्य स्रोत आणि त्याच्या मालकीच्या लक्झरी गाड्या हे त्याच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय राहिला आहे. तर चला मग जाणून घेऊया.

Jasprit Bumrah Income : बुमराहचे वार्षिक उत्पन्न किती आहे?
जसप्रीत बुमराहच्या कमाईचा मोठा भाग भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI), इंडियन प्रीमियर लीग (IPL) आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून मधून तो दर वर्षाला मोठी कमाई करतो. बीसीसीआयच्या वार्षिक करारात त्याला ग्रेड ए श्रेणीमध्ये स्थान देण्यात आले आहे, ज्यामुळे त्याला दरवर्षी 5 कोटी रुपये मिळतात. याशिवाय तो कसोटी सामने खेळण्यासाठी 15 लाख रुपये, एकदिवसीय सामन्यांसाठी 7 लाख रुपये आणि टी-20 सामन्यांसाठी 3 लाख रुपये सामना फिस म्हणून कमावतो.
आयपीएलमधून किती कमाई करतो?
बुमराहने 2013 मध्ये मुंबई इंडियन्सकडून फक्त 10 लाख रुपयांमध्ये पदार्पण केले होते, पण आज तो संघातील सर्वात महागड्या खेळाडूंपैकी एक आहे. आयपीएल 2025 च्या लिलावापूर्वी मुंबई इंडियन्सने त्याला 18 कोटी रुपयांना कायम ठेवले होते. रिपोर्ट्सनुसार बुमराहने 2013 ते 2024 पर्यंत आयपीएलमधून सुमारे 68 कोटी रुपये कमावले आहेत.
बुमराहची एकूण संपत्ती किती आहे?
स्पोर्ट्सकीडा आणि इतर रिपोर्टनुसार जसप्रीत बुमराहची एकूण संपत्ती $7 दशलक्ष (अंदाजे 60 कोटी रुपये) आहे. याशिवाय तो जाहिरातींमधूनही भरपूर कमाई करतो.
बुमराह ब्रँड एंडोर्समेंटमधून किती कमावतो?
बुमराह हा भारतातील टॉप ब्रँड एंडोर्सर्सपैकी एक आहे. तो प्रत्येक जाहिरातीसाठी 1.5 ते 2 कोटी रुपये घेतो. त्यांनी वनप्लस, बोट, ड्रीम-11, टाटा पंच, थम्स अप, झॅगल, कल्टस्पोर्ट आणि भारतपे सारख्या मोठ्या ब्रँडशी करार केला आहे. यातून बूमराहला दरवर्षी मोठी कमाई होते.
जसप्रीत बुमराहची मालमत्ता आणि लक्झरी लाइफस्टाईल
लग्नानंतर बुमराहने मुंबईत 2 कोटी रुपयांचा आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. अहमदाबादमध्ये त्यांचा 3 कोटी रुपयांचा डुप्लेक्स बंगलाही आहे. याशिवाय, त्यांची पुणे आणि देशाच्या इतर भागातही मालमत्ता आहे.
Jasprit Bumrah Net Worth: जसप्रीत बुमराहचे कार कलेक्शन
- मर्सिडीज-मेबॅक एस 560 - 2.54 कोटी रुपये
- निसान जीटी-आर - 2.17 कोटी रुपये
- रेंज रोव्हर वेलार - 90 लाख रुपये
- टोयोटा इनोव्हा क्रिस्टा - 25 लाख रुपये
जसप्रीत बुमराहची क्रिकेट कारकीर्द
बुमराहने आतापर्यंत भारतासाठी 36 कसोटी, 89 एकदिवसीय आणि 64 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 159, एकदिवसीय सामन्यात 149 आणि टी-20 मध्ये 79 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच वेळी त्याच्या नावावर 133 आयपीएल सामन्यांमध्ये 165 विकेट्स आहेत.
बुमराह 2025 च्या आयपीएलमध्ये खेळेल का?
मुंबई इंडियन्सचे चाहते त्याच्या परतीची वाट पाहत आहेत. परंतु वृत्तानुसार, बुमराह अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही. दरम्यान तो बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये गोलंदाजी करत आहे. अशा परिस्थितीत तो आयपीएल 2025 च्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळू शकेल की नाही हे पाहणे बाकी आहे.
-
अशोक खरातचा 'खेळ' खल्लास? एसआयटीच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर! -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
लिव्ह-इन, लॅविश लाईफ आणि ३५० कोटींची माया; 'मेजर इक्बाल' अर्जुनचा पडद्यामागचा शाही थाट -
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
सोनं झालं स्वस्त! युद्धाच्या काळातही दरात 'एवढ्या' हजारांची ऐतिहासिक घसरण; खरेदी करावं की थांबावं? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं?





Click it and Unblock the Notifications