हार्दिक पंड्याची मॅगी स्टोरी काय आहे, SRH टीममधील या खेळाडूला कशी मिळाली प्रेरणा, संपूर्ण कहाणी काय?
Aniket Verma Hardik Pandya Maggi Story : IPL 2025 च्या आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबादला अनिकेत वर्माच्या रूपात एक नवा स्टार मिळाला आहे. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात त्याने 41 चेंडूत 74 धावांची तुफानी खेळी खेळून प्रसिद्धी मिळवली.
रातोरात स्टार बनलेला 23 वर्षीय अनिकेत वर्मा हार्दिक पंड्याच्या फेस मॅगी कथेने प्रेरित झाला. शेवटी, या मॅगीची गोष्ट काय आहे? हार्दिक पंड्या आणि त्याचा भाऊ कृणाल पंड्या यांच्या जीवनाशी निगडीत मॅगी कहाणी काय हे आपण समजून घेणार आहोत. तर अनिकेत वर्मा त्यांची स्टोरी ऐकूण कसा प्रेरीत झालाय, याबाद्दल जाणून घेणार आहोत.

मिळालेल्या माहितीनुसार, अनिकेत वर्माच्या काकांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले की, त्यांनी अनिकेत 14 वर्षांचा असताना त्याला पंड्या बंधूंची कहाणी सांगितली होती. तो प्रशिक्षणासाठी अकादमीत जात होता आणि अगदी लहान वयातच त्याने अनिकेतमध्ये यश मिळवण्याची भूक पाहिली.
हार्दिक पंड्याच्या मॅगीच्या कथेतून मिळाली प्रेरणा
टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना अनिकेत वर्माचे काका अमित वर्मा म्हणाले की, त्यावेळी अनिकेत 14 वर्षांचा असावा. मी ही गोष्ट वर्तमानपत्रात वाचली होती आणि एकदा अकादमीत जाताना अनिकेतला ती गोष्ट सांगितली होती. त्या दिवशी मला अनिकेतमध्ये विजयाची भूक, जोश आणि वचनबद्धता दिसली. त्याला मोठी उंची गाठायची होती. त्यासाठी त्याने अथक प्रयत्न व मेहनत देखील केले आहेत.
अन् अनिकेतला पहिला चांगला बूट मिळाला
अनिकेतचे काका अमित यांनी पुढे बोलताना सांगितले की, तो त्या काळात एका कार शोरूममध्ये काम करायचा. अनिकेत फाटलेल्या बुटांनी खेळायचा, म्हणून मी त्याला ताबडतोब दुकानात घेऊन गेलो आणि त्याला 1200 रुपयांचे नवीन बूट आणून दिले. अमित यांनी सांगितले की, त्याने आयुष्यात कधीही इतकी महागडी वस्तू खरेदी केली नव्हती, पण तो अनिकेतसाठी काहीही करायला तयार होता. त्या रात्री अनिकेत नवीन बूट घालून झोपला.
हार्दिक-कुणालची मॅगी स्टोरी काय आहे?
हार्दिक पंड्या आणि कुणाल पंड्या या दोन्ही भावांची क्रिकेट करिअरमधील सुरुवात अतिशय खडतर होती. घरची परिस्थिती बेताची होती. परंतु. या दोघा भावांनी आयुष्यात कधीही माघार घेतली नाही. अतिशय खडतर जीवन प्रवास करत असताना या दोघा भावांनी सुरुवातीच्या काळात मॅगी खाऊन जीवन जगले. परंतु, क्रिकेट विश्वात त्यांनी स्वत:चे आयुष्य उभे केले.












Click it and Unblock the Notifications