IPL 2025 Final : RCB vs PBKS, फायनल कोण जिंकणार? संभाव्य XI, खेळपट्टी आणि संपूर्ण माहिती
IPL 2025 च्या अंतिम फेरीसाठी दोन बलाढ्य संघ आमनेसामने येणार आहेत. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्स. आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा महामुकाबला रंगणार असून, क्रिकेटप्रेमींमध्ये या सामन्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे.

RCB vs PBKS Final: दोन्ही संघांचा प्रवास
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने क्वालिफायर-1 मध्येच बाजी मारत पंजाब किंग्सवर मात केली आणि अंतिम फेरीत धडक मारली. त्यानंतर पंजाब किंग्सने क्वालिफायर-2 मध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव करत ऐतिहासिक पुनरागमन केले आणि अंतिम लढतीत प्रवेश मिळवला.
पंजाब किंग्सचा ऐतिहासिक क्षण
साल 2014 नंतर प्रथमच पंजाब किंग्स संघ अंतिम सामन्यात खेळणार आहे. तब्बल 11 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पंजाबला ही संधी मिळाली आहे. हे संघाचे दुसरे IPL Final असेल. दुसरीकडे, बंगळुरू संघासाठी हा चौथा IPL Final असणार आहे. शेवटचा अंतिम सामना RCB ने 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध खेळला होता.
संभाव्य प्लेइंग XI - पंजाब किंग्स
प्रियांश आर्य
प्रभसिमरन सिंग
जोश इंग्लिस (यष्टीरक्षक)
श्रेयस अय्यर (कर्णधार)
नेहल वढेरा
शशांक सिंग
मार्कस स्टोइनिस
अजमातुल्ला ओमरझाई
विजयीश कुमार
अरविज कुमार
विजयकुमार सिंग
इम्पॅक्ट प्लेअर: युझवेंद्र चहल / हरप्रीत ब्रार
संभाव्य प्लेइंग XI - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू
फिल सॉल्ट
विराट कोहली
मयंक अग्रवाल
रजत पाटीदार (कर्णधार)
जितेश शर्मा (यष्टीरक्षक)
रोमॅरियो शेफर्ड
क्रुणाल पांड्या
जोश कुमार
जोश हेजलवुड
सुयश शर्मा
इम्पॅक्ट प्लेअर: लियाम लिव्हिंगस्टोन / टिम डेव्हिड
नरेंद्र मोदी स्टेडियमची खेळपट्टी - फलंदाजांसाठी मेजवानी
अहमदाबादच्या मैदानावरील खेळपट्टी ही फलंदाजांना साथ देणारी ठरत आहे. क्वालिफायर-2 मध्येही येथे मोठ्या धावसंख्येची नोंद झाली होती. मुंबई इंडियन्सने 203 धावा केल्या होत्या, ज्या पंजाब किंग्सने सहज पार केल्या. या हंगामात या मैदानावर एकूण आठ सामने झाले असून, पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाने सहा वेळा विजय मिळवला आहे.
IPL 2025 चा अंतिम सामना हे केवळ एक स्पर्धात्मक क्रिकेट मॅच नसून, इतिहास रचण्याची संधी आहे - पंजाबसाठी पहिल्या विजेतेपदाची आणि RCB साठी बहुप्रतीक्षित चॅम्पियन बनण्याची! कोणता संघ चमकेल हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.












Click it and Unblock the Notifications