प्रतीक्षा संपली, Jasprit Bumrah मुंबई इंडियन्समध्ये सामील; 'या' संघाविरुद्ध मैदानात करणार पुनरागमन!
IPL 2025, Jasprit Bumrah : जगातील सर्वात धोकादायक गोलंदाजांपैकी एक आणि मुंबई इंडियन्स संघात समाविष्ट असलेला जसप्रीत बुमराह आयपीएल 2025 मध्ये खेळण्यास सज्ज आहे.
संघाचा पुढील सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी आहे. या सामन्यापूर्वी, संघाने माहिती दिली की जसप्रीत बुमराह संघात सामील झाला आहे आणि तो खेळण्यास आता सक्षम झाला आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
दुखापत कधी झाली अन् कधीपासून दूर गेला होता बुमराह?
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मालिकेतील (BGT) पाचव्या सामन्यात जसप्रीत बुमराहला दुखापत झाली होती, त्यानंतर तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर झाला. तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही खेळला नाही, तर आयपीएलमध्येही त्याच्या खेळण्याबाबत अनिश्चितता होती. या हंगामात मुंबई इंडियन्सचा प्रवास लक्षात घेता, बुमराहचे संघात पुनरागमन हार्दिक पंड्या आणि संघासाठी मोठा दिलासा देणार असणार आहे.

बुमराहच्या पुनरागमनाचा व्हिडिओ एमआयने शेअर केला
जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनावर मुंबई इंडियन्सने शेअर केलेला व्हिडिओ आणि त्याचे एडिटिंग लोकांना खूप आवडले आहे. सिंहाच्या परतीच्या शैलीत, टीमने लिहिले, 'द लायन इज बॅक'.
𝑹𝑬𝑨𝑫𝒀 𝑻𝑶 𝑹𝑶𝑨𝑹 🦁#MumbaiIndians #PlayLikeMumbai #TATAIPL pic.twitter.com/oXSPWg8MVa
— Mumbai Indians (@mipaltan) April 6, 2025
बुमराह आयपीएल-2025 मध्ये कधी खेळणार?
आता चाहते जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सच्या जर्सीमध्ये मैदानावर येऊन सामना खेळण्याची वाट पाहत आहेत. तथापि, अशी बातमी आहे की, सामना खेळण्यापूर्वी बुमराह संघासोबत सराव सामना खेळू शकतो.
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा पुढील सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी आहे, जो 7 एप्रिल रोजी वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल.
हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सचा प्रवास आतापर्यंत चांगला राहिलेला नाही. या हंगामातील पहिले दोन सामने गमावल्यानंतर, संघाने वानखेडेवर केकेआरविरुद्धचा तिसरा सामना जिंकला.
पण चौथ्या सामन्यात त्यांना लखनौ सुपर जायंट्सकडून पराभव पत्करावा लागला. सध्या, ४ पैकी १ विजयानंतर हा संघ पॉइंट टेबलमध्ये तळाशी (१० व्या) आहे.












Click it and Unblock the Notifications