Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

एमएस धोनी आऊट होताच महिला चाहती रागाने झाली लाल, सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल, पहा व्हिडीओ

IPL 2025: आयपीएल सामन्यादरम्यान अनेक क्रिकेट चाहते व्हायरल होतात आणि एका रात्रीत स्टार होतात. राजस्थान रॉयल्स वि चेन्नई सुपर किंग यांच्यातील एका सामन्यातील असाच एक प्रसंग कॅमे-यात कैद झाला आहे. चेन्नईला शेवटच्या षटकात 20 धावांची आवश्यकता होती आणि धोनी स्ट्राईकवर होता.

धोनी क्लासिक फिनिश देईल असे वाटत होते, पण संदीप शर्माच्या कमी वाइड फुल टॉसवर धोनीने लॉन्ग-ऑनकडे मोठा शॉट मारला पण शिमरॉन हेटमायरने जबरदस्त डायव्ह लगावत त्याचा झेल घेतला.. पण धोनीच्या बाद झाल्यानंतर सीएसकेचे चाहते खूप निराश झाले आहेत. त्याच वेळी सीएसकेच्या एका महिला चाहत्याची प्रतिक्रिया समोर आली आहे, जी सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, खरं तर, धोनीच्या बाद झाल्यानंतर आणि हेटमायरच्या झेलवर महिला चाहत्याने ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिली आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Ms dhoni  fan girl reaction viral

या फॅन गर्लच्या एकाच शॉटमध्ये दोन प्रतिक्रिया दिसून येतात आणि हे सर्व काही सेकंदात घडले. यानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केला आणि या फॅन गर्लची खिल्ली उडवली. अनेकांना ही प्रतिक्रिया खूप मनोरंजक वाटली आणि सोशल मीडियावर त्याचा पूर आला आहे.

या पराभवानंतर सीएसकेने सलग 2 सामने गमावले आहेत. पाच वेळा विजेत्या संघाने आपल्या सीझनधील पहिला सामना जिंकला होता. पण तेव्हापासून त्यांना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभव पत्करावा लागला आहे. या आयपीएलमध्ये धोनीच्या फलंदाजीच्या स्थानाबद्दलही बरीच चर्चा सुरू आहे.

संघाच्या कोचने धोनी बाबत केला धक्कादायक खुलासा

आयपीएल 2025 च्या या सीझनमध्ये महेंद्रसिंग धोनीला खालच्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना जेव्हा जास्त षटके शिल्लक नसतात तेव्हा तो मैदानावर खेळायला येतो. धोनीला याबद्दल बरीच टीकाही सहन करावी लागत आहे. राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात माही सातव्या क्रमांकावर आला. याआधी तो नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. यानंतर सोशल मीडियावर माहीवर बरीच टीका झाली. आता इतक्या खालच्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचं कारण काय ? याबाबतचा धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

महेंद्रसिंग धोनीने खालच्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचे कारण संघाचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनी दिले आहे. स्टीफन फ्लेमिंग यांनी माध्यमांशी बोलताना एक धक्कादायक खुलासा केला आहे. यामध्ये त्यांनी फिटनेसच्या समस्यांचा उल्लेख केला आहे. फ्लेमिंग म्हणाले की तो पूर्णपणे तंदुरुस्त नाही. 2023 मध्ये गुडघ्याच्या दुखापतीमुळे माहीवर शस्त्रक्रिया झाली होती. यामुळे त्याला वरच्या क्रमात फलंदाजी करणे शक्य नाही. धोनीला अजूनही गुडघ्याचा त्रास आहे.

फ्लेमिंग म्हणाले की, धोनीचे गुडघे आता पूर्वीसारखे राहिलेले नाहीत. तो असा चालू शकत नाही. तो संपूर्ण 10 षटके फलंदाजी करू शकत नाही, म्हणूनच त्याचा फलंदाजीचा क्रम खालचा आहे. धोनीची खेळण्याची स्थिती सामना आणि त्याच्या तंदुरुस्तीच्या आधारे निश्चित केली जाईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+