Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

DC vs LSG: कोण आहे विपराज निगम? पहिल्याच मॅचमध्ये पहिल्याच चेंडूवर विकेट घेत केली स्फोटक फलंदाजी!

Ipl 2025 dc vs lsg who is vipraj nigam : आपल्या कारकिर्दीच्या पहिल्याच सामन्यात पहिल्याच चेंडूवर विकेट घेणारा गोलंदाज किती भाग्यशाली असेल आणि त्यातच त्याने जर बॅटींगमध्येही कमाल केली तर धमालच..अशीच गोष्ट घडली विपराज निगमसोबत हा नवखा खेळाडू दिल्लीकडून खेळत असून त्याने लखनऊविरुद्धच्या सामन्यात कमाल केली आहे.

उत्तर प्रदेशच्या 20 वर्षीय विपराज निगमने मैदानावर चौकार आणि षटकार ठोकले. त्याने स्ट्राइक रेटच्या बाबतीत निकोलस पूरनलाही मागे सोडले. विपराज निगमने 15 चेंडूत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 39 धावा काढण्यात यश मिळविले.

Ipl 2025 dc vs lsg

कोण आहे विपराज निगम (IPL 2025 DC vs LSG)

  • विपराज निगम हा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे.
  • आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात दिल्ली कॅपिटल्सने निगमला 50 लाख रुपयांना विकत घेतले होते.
  • निगमने पहिल्याच सामन्यात आपली क्षमता सिद्ध केली.
  • विपराज निगमने देशांतर्गत क्रिकेटमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली आहे.
  • सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2024-25 मध्ये त्याने 8 विकेट घेतल्या. याशिवाय त्याने बॅटनेही ताकद दाखवली. लखनौकडून आशुतोष शर्माने विजय हिसकावून घेतला.

हेही वाचा : सर्व धुरंधर फेल! अंतीम षटकात सिक्सर ठोकून साकारला विजय, दिल्लीसाठी वनमॅन आर्मी बनला आशुतोष शर्मा!

विपराजच्या मदतीने साकारला विजय

दिल्ली कॅपिटल्सने अवघ्या 65 धावांत 5 विकेट गमावल्या होत्या. दिल्लीचा संघ लक्ष्याच्या जवळपासही पोहोचू शकणार नाही, असे वाटत होते. मात्र यानंतर आशुतोषसह विपराज निगम आणि त्यानंतर कुलदीप यादवने संघाला विजयापर्यंत नेले. दिल्लीने पहिल्या षटकातच 2 विकेट गमावल्या होत्या. दिल्लीला येथून परतणे अशक्य वाटत होते.

DC vs LSG आशुतोष शर्माने चाहत्यांची मने जिंकली. लखनऊ संघाने प्रथम फलंदाजी करताना चमकदार कामगिरी केली, विशेषत: निकोलस पूरन आणि मिचेल मार्श यांच्या अर्धशतकी खेळीमुळे संघाने मोठी धावसंख्या उभारली. दिल्लीने नेत्रदीपक लक्ष्याचा पाठलाग करत अखेर सामना जिंकला. दिल्लीच्या लॉ ऑर्डर बॅट्समननी लखनौचा सामना हिसकावून घेतला. विशेषतः आशुतोष शर्माने आपल्या फलंदाजीने चाहत्यांची मने जिंकली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+