DC vs LSG : दिल्लीची विजयाने सुरुवात, लखनऊवर एका विकेटने विजय, शेवटच्या ओव्हरपर्यंत रंगला थरार
Ipl 2025 DC vs LSG Today match 24 march 2025 live updates : नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर लखनौने २० षटकांत आठ गडी गमावून २०९ धावा केल्या. प्रत्युत्तरात, दिल्ली कॅपिटल्सने १९.३ षटकांत नऊ गडी गमावून २११ धावा केल्या आणि सामना एका गडी राखून जिंकला. सामन्याचे तीन चेंडू शिल्लक होते.
पहिल्या 10 ओव्हरमध्ये लखनऊने 117 धावा काढल्या..!
- लखनौने 10 षटकांत एका गडी गमावून 117 धावा केल्या.
- मिचेल मार्श आणि निकोलस पूरन नाबाद आहेत.
- मार्शने आपले अर्धशतक पूर्ण केले आहे.
- पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या विपराज निगमने एडेन मार्करामला (१५ धावा) पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले.
ऋषभ पंत प्रथमच करतोय लखनऊचे नेतृत्व
ऋषभ पंतने आपली संपूर्ण आयपीएल कारकीर्द दिल्ली कॅपिटल्ससह खेळली होती आणि संघाचे नेतृत्व देखील केले होते. त्याने गेल्या वर्षीच्या मेगा लिलावापूर्वी फ्रेंचायझी सोडली आणि दिल्लीऐवजी तो आता लखनऊ सुपर जायंट्स संघात आहे. त्याला 27 कोटी रुपयांना लखनऊ संघाने विकत घेतले आहे.

KL राहुल याने IPL पदार्पणापासून दोन सत्रांसाठी लखनऊ सुपर जायंट्सचे नैतृत्व केले होते, तो आता दिल्ली कॅपिटल्समध्ये संघाचा भाग बनला आहे. तो संघाचे नेतृत्व करणार नसला तरी, भारतीय अष्टपैलू अक्षर पटेल आता कर्णधारपदाची धुरा सांभाळत असताना, तो एक प्रमुख फलंदाज म्हणून महत्त्वाची भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे.
मुंबई इंडियन्सप्रमाणेच, दिल्ली कॅपिटल्सकडे कर्णधारपदासाठी अनेक पर्याय होते, ज्यात फाफ डू प्लेसिस आणि राहुल यांचा समावेश होता. तथापि, त्यांनी अक्षर पटेलची निवड केली, ज्यांच्या कारकीर्दीत प्रगती होत आहे.
IPL 2025: DC vs LSG ड्रिम 11
DC ड्रिम 11 (संभाव्य) : जेक फ्रेझर-मॅकगर्क, फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल, केएल राहुल (विकेटकीपर), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), आशुतोष शर्मा, समीर रिझवी/मोहित शर्मा, कुलदीप यादव, मिचेल स्टार्क, टी नटराजन.
दिल्ली कॅपिटल्स इम्पॅक्ट सब्स: मुकेश कुमार
एलएसजी ड्रिम 11 (संभाव्य) : युवराज चौधरी, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार, विकेटकीपर), निकोलस पूरन, आयुष बडोनी, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शाहबाज अहमद, राजवर्धन हंगरगेकर, रवी बिश्नोई, शामर जोसेफ.
लखनऊ सुपर जायंट्स इम्पॅक्ट सब्स : प्रिन्स यादव
इंडियन प्रीमियर लीगमध्ये DC विरुद्ध LSG आमने-सामने
- एकूण खेळलेले सामने : 5
- दिल्ली कॅपिटल्स जिंकली : 2
- लखनऊ सुपर जायंट्स जिंकले : 3
- परिणाम नाही: 0
आयपीएलच्या आजच्या मॅचसंदर्भात तुमच्या प्रश्नांची उत्तरे
24 मार्च रोजी कधी आणि कुठे होणार सामना?
24 मार्च रोजी आयपीएल 2025 चा चौथा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे.
DC vs LSG IPL 2025 सामन्याचे ठिकाण कोणते आहे?
विशाखापट्टणम डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील IPL 2025 सामना आयोजित केला जाईल.
DC विरुद्ध LSG साठी थेट नाणेफेक कधी होईल?
DC विरुद्ध LSG क्रिकेट सामन्यासाठी थेट नाणेफेक IST संध्याकाळी 7:00 वाजता होईल. त्यानंतर सामना साडेसात वाजता सुरु होईल.
DC vs LSG IPL 2025 सामन्याचे कोणते टीव्ही चॅनेल थेट प्रक्षेपण करतील?
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स सामन्याचे थेट प्रक्षेपण Star Sports Network च्या Star Sports 1 HD/SD वर इंग्रजी समालोचनासह उपलब्ध असेल.
आजच्या DC vs LSG IPL 2025 सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग भारतात कसे बघावे?
जिओ हॉटस्टार ॲप आणि वेबसाइट डीसी विरुद्ध एलएसजी सामन्याचे थेट प्रवाह प्रदान करेल.












Click it and Unblock the Notifications