Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL 2025: ट्रिस्टन स्टब्जला आठवली नानी; लखनऊने एकाच षटकांत मारले 4 छक्के आणि 1 चौका, पहा व्हिडीओ

विशाखापट्टणम येथील डाॅ. वायएस राजशेखर रेड्डी मैदानावर आयपीएलचा पाचवा सामना सुरु आहे. आज लखनऊ सुपर जायंट्स व दिल्ली कॅपिटल यांच्यात लढत होत आहे. या सामन्यांत एलएसजीचा स्टार फलंदाज निकोलस पूरन याने एक विक्रम आपल्या नावे केला. आयपीएलच्या आजच्या सामन्यात टी- २० सामन्यांत ६०० षटकार मारणारा तो चौथा फलंदाज ठरला. पूरनने आपला रौद्रावतार दाखवला खरा मात्र ट्रोल झाला ट्रिस्टन स्टब्ज. ट्रिस्टन स्टब्सने एकाच षटकांत २८ धावा दिल्या. पूरनने त्याला सलग चार चेंडूवर चार छक्के आणि पाचव्या चेंडूवर चौकार मारला. पूरनची ही खेळी पाहून स्टब्जने तोंडात बोटे घातली.

Tristan Stubbs Becomes the Most Expensive Bowler

पूरनचे ६०० षटकार

दिल्ली कॅपिटल विरूद्धच्या सामन्यांत आपले ६०० षटकार पूर्ण करण्यासाठी पूरनला फक्त एका षटकाराची आवश्यकता होती. डावाच्या सातव्या षटकांत त्याने विप्रज निमजच्या तिसऱ्या चेंडूवर गगनचुंबी षटकार मारत आपले ६०० षटकार पूर्ण केले. पूरनने ३८५ टी-२० सामन्यांमध्ये ६०० षटकार मारण्याची किमया साध्य केली. त्याने लखनौ सुपर जायंट्ससाठी खेळताना ३० आयपीएल सामन्यांमध्ये आतापर्यंत ६५ षटकार मारले आहेत.

सर्वाधिक षटकार कुणाचे

टी-२० मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल याच्या नावावर आहे. आपल्या १७ वर्षांच्या टी-२० कारकिर्दीत गेलने ४६३ सामने खेळले आणि १०५६ षटकार मारले. त्याच्यानंतर किरॉन पोलार्ड (६९५ सामन्यांमध्ये ९०८ षटकार) आणि आंद्रे रसेल (५३९ सामन्यांमध्ये ७३३ षटकार) यांचा क्रमांक लागतो.

ट्रिस्टनने दिल्या २८ धावा

आयपीएल २०२५ ची सुरुवात उत्तम शैलीत झाली आहे. २३ मार्च रोजी एसआरएचच्या फलंदाजांचा एक वादळ आला आणि दुसऱ्याच दिवशी लखनऊ सुपर जायंट्सच्या फलंदाजांनी कहर केला. निकोलस पूरन आणि मिशेल मार्श यांनी दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांना चांगलेच झोडपले. दिल्ली कॅपिटल्सच्या कर्णधाराने ट्रिस्टन स्टब्सला एक षटक दिले, ज्यामध्ये त्याने २८ धावा दिल्या.

१३ व्या षटकांत आले वादळ

पूरन फलंदाजी करत होता. डावाच्या १३ व्या षटकात अर्धवेळ फिरकी गोलंदाजी करणारा ट्रिस्टन स्टब्स गोलंदाजी करण्यासाठी आला. समोर निकोलस पूरन होता, जो अतिशय धोकादायक पद्धतीने फटके मारत होता. षटकाचा पहिला चेंडू ठिपका होता, पण दुसऱ्या चेंडूवर पूरनने षटकार मारला.निकोलस पूरन इतका कहर करत होता की त्याने दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि नंतर पाचव्या चेंडूवरही षटकार मारला. या सलग चार षटकारांसह, स्टब्सने षटकाच्या पहिल्या पाच चेंडूंमध्ये २४ धावा दिल्या. शेवटच्या चेंडूवर पूरनने चौकार मारला आणि षटकात एकूण २८ धावा दिल्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+