Watch Video : CSK हरल्यानंतर अभिनेत्री श्रुती हसन स्टेडिअमवरच ढसाढसा रडली; धोनीचेही डोळे पाणावले
सध्या आयपीएल- २०२५ चा उत्साह शिगेला पोहोचला आहे. शुक्रवारी चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम या स्पर्धेचा ४३ वा सामना खेळविला गेला. त्यात ५ वेळेचा विजेता चेन्नई सुपर किंग्ज (CSK) चा सनरायझर्स हैदराबाद (SRH) ने दणदणीत पराभव केला. हा सामना पाहण्यासाठी अभिनेत्री श्रुती हासन आली होती. तिने धोनीच्या सीएसकेला जोरदार पाठींबा दिला. मात्र धोनीचा संघ हारल्यानंतर श्रुतीला आपले अश्रू लपवता आले नाही. स्टेडिअममध्येत तिच्या डोळ्यात पाणी आले. रडतानाचे तिचे काही फोटो व व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

श्रुतीच्या डोळ्यातून ओघळले अश्रू
श्रुती तिच्या मैत्रिणींसोबत हा सामना पाहण्यासाठी आली होती. प्रेक्षकांमध्ये बसून तिने सामना एन्जॉय केला. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी फलंदाजीला आला तेव्हा श्रुतीने तिच्या मोबाईल फोनमध्ये त्याचे फोटोही काढले. ती खूप आनंदी दिसत होती. परंतु सीएसके सामना गमावल्यानंतर मात्र ती प्रचंड निराश झाली. तिला अश्रू अनावर झाले. श्रुती हासन व्यतिरिक्त अभिनेता तमिळ सुपरस्टार अजित कुमार आणि इतर अनेक कॉलीवूड सेलिब्रिटी देखील सामना पाहण्यासाठी आले होते.
श्रुतीचा व्हिडीओ व्हायरल
चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यातील श्रुती हासनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये ती खूप भावनिक दिसत आहे. ती स्वतःच्या हातांनी अश्रू पुसतानाही दिसत आहे. तिच्या आवडत्या संघाला हरताना पाहून तिचे मन दुखावले आणि ती निराश झाली. रडण्यापासून ती स्वतःला रोखू शकली नाही. त्यांच्याशिवाय ज्येष्ठ अभिनेते अजित कुमार व त्यांचा मुलगाही चेन्नई सुपर किंग्जच्या जर्सीमध्ये दिसले.
Shruti Haasan breaks down after CSK loss ⁉️ 🥹🥹🥹😭😭#CSKvsSRH #ShrutiHaasanpic.twitter.com/vli1Dj1Ze1
— Pan India Review (@PanIndiaReview) April 25, 2025
चेन्नईला दारुण पराभव
सनरायझर्स हैदराबादने चेन्नई सुपर किंग्जचा ८ चेंडू शिल्लक ठेवत ५ विकेट्सने पराभव केला. एसआरएचने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सीएसकेचा डाव फक्त १५४ धावांवर गुंडाळला. चेन्नईकडून युवा फलंदाज आयुष म्हात्रेने जलद ३० धावा केल्या. पदार्पण करणाऱ्या डेवाल्ड ब्रेव्हिसने ४४ धावांची खेळी केली. तथापि कर्णधार धोनीची फलंदाजी अपयशी ठरला. तो १० चेंडूत फक्त ६ धावा करू शकला. एसआरएचने हे छोटे लक्ष्य १८.४ षटकांत पूर्ण केले.
सलग पराभवांमुळे चाहते निराश
घरच्या मैदानावर चेन्नईचा आणखी एक पराभव झाल्याने संघाच्या चाहत्यांची निराशा झाली. या पराभवामुळे संघाच्या प्लेऑफच्या आशा जवळजवळ संपल्या आहेत. परिस्थिती अशी आहे की आता हा संघ केवळ चमत्काराच्या जोरावर प्लेऑफमध्ये प्रवेश करू शकेल. संघाचे आता पाच सामने शिल्लक आहेत आणि त्यांना प्रत्येक सामना जिंकावा लागेल. संघाने सध्या नऊ पैकी सात सामने गमावले आहेत. फक्त दोन सामने जिंकले आहेत. संघ सध्या पॉइंट्स टेबलमध्ये शेवटच्या स्थानावर आहे.












Click it and Unblock the Notifications