International Masters League: सचिन तेंडूलकरकडे नेतृत्व; युवराज, रैना, पठाण खेळणार, वाचा वेळापत्रक
आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ही स्पर्धा येत्या 22 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. या स्पर्धेत इंडिया मास्टर्ससह श्रीलंका मास्टर्स, वेस्ट इंडिज मास्टर्स, ऑस्ट्रेलियन मास्टर्स, दक्षिण अफ्रिका मास्टर्स आणि इंग्लंड मास्टर्स हे संघ भाग घेणार आहेत.

सचिनकडे नेतृत्व
इंडिया मास्टर्स संघाचे नेतृत्व सचिन तेंडुलकरकडे देण्यात आले आहे. यासाठी भारताच्या 15 खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली आहेत. भारतीय संघात खेळलेल्या खेळाडूंचा या संघात समावेश आहे. सचिन तेंडुलकरसह या संघात युवराज सिंग, इरफान पठाण, सुरेश रैना, युसूफ पठाण आणि अंबाती रायुडू असे स्टार खेळाडू आहेत.
कसा आहे भारतीय संघ?
सचिन तेंडुलकर (कर्णधार), युवराज सिंग, सुरेश रैना, अंबाती रायुडू, युसूफ पठाण, इरफान पठाण, स्टुअर्ट बिन्नी, धवल कुलकर्णी, विनय कुमार, शाहबाज नदीम, राहुल शर्मा, गुरकीरत सिंग मान, अभिमन्यू मिथुन, पवन नेगी,नमन ओझा.
मास्टर्स लीग 2025 स्पर्धेचं वेळापत्रक
22 फेब्रुवारी - भारत विरुद्ध श्रीलंका - मुंबई - संध्याकाळी 7:30
23 फेब्रुवारी - ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका - मुंबई - संध्याकाळी 7:30
24 फेब्रुवारी - श्रीलंका विरुद्ध इंग्लंड - मुंबई - संध्याकाळी 7:30
25 फेब्रुवारी - वेस्ट इंडिज विरुद्ध ऑस्ट्रेलिया - मुंबई - संध्याकाळी 7:30
27 फेब्रुवारी - भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका - लखनौ - संध्याकाळी 7:30
28 फेब्रुवारी - दक्षिण आफ्रिका विरुद्ध इंग्लंड - लखनौ - संध्याकाळी 7:30
1 मार्च - भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया - लखनौ - संध्याकाळी 7:30
2 मार्च - वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका - लखनऊ - संध्याकाळी 7:30
3 मार्च - इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया - लखनौ - संध्याकाळी 7:30
4 मार्च - वेस्ट इंडिज विरुद्ध दक्षिण आफ्रिका - लखनौ - संध्याकाळी 7:30
5 मार्च - भारत विरुद्ध इंग्लंड - रायपूर - संध्याकाळी 7:30
6 मार्च - श्रीलंका विरुद्ध इंग्लंड - रायपूर - संध्याकाळी 7:30
8 मार्च - भारत विरुद्ध वेस्ट इंडिज - रायपूर - संध्याकाळी 7:30
10 मार्च - श्रीलंका विरुद्ध ऑस्ट्रेलिया - रायपूर - संध्याकाळी 7:30
11 मार्च - वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड - रायपूर - संध्याकाळी 7:30
13 मार्च - उपांत्य फेरी 1 - रायपूर - संध्याकाळी 7:30
14 मार्च - उपांत्य फेरी 2 - रायपूर - संध्याकाळी 7:30
16 मार्च - ग्रँड फिनाले - रायपूर - संध्याकाळी 7:30












Click it and Unblock the Notifications