IML 2025 Final: वेस्ट इंडिजचा पराभव, सचिनच्या संघाने मास्टर्स लीग स्पर्धा जिंकली, रायडूच्या 74 धावा
आंतरराष्ट्रीय मास्टर्स लीग 2025 चा अंतिम सामना वेस्ट इंडिज आणि भारत यांच्यात खेळला गेला. रविवारी झालेल्या अंतिम सामन्यात भारताने वेस्ट इंडिज मास्टर्सचा 6 गडी राखून पराभव करून पहिले लीग जेतेपद पटकावले.
नाणेफेक जिंकल्यानंतर, वेस्ट इंडिज मास्टर्सने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु इंडिया मास्टर्सच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत त्यांना 148/7 च्या तुटपुंज्या धावसंख्येवर रोखले. लेंडल सिमन्सचे अर्धशतक हा त्यांच्या डावाचा कणा होता, तर उर्वरित वेस्ट इंडिज संघाला भागीदारी करण्यासाठी संघर्ष करावा लागला.

भारताकडून विनय कुमार आणि शाहबाज नदीम यांनी आपापसात टिच्चून गोलंदाजी करत वेस्ट इंडिज मास्टर्सला 7 बाद 148 धावांवर रोखले. लेंडल सिमन्स (41 चेंडूत 57) आणि ड्वेन स्मिथ (35 चेंडूत 45) यांनी महत्त्वपूर्ण खेळी केल्या परंतु कुमार (26 चेंडूत 3 बळी) आणि नदीम (12 धावात 2 बळी) यांच्या स्पेलमुळे भारताला विंडिजच्या फलंदाजीला 150० धावांच्या खाली रोखण्यात मदत झाली.
अंबाती रायडूने रचला विजयाचा पाया, सचिनच्या 25 धावा
भारतासाठी, अंबाती रायडूने 50 चेंडूत 74 धावा केल्या, ज्यामुळे इंडिया मास्टर्सला 17.1 षटकात विजय मिळवण्यात मदत झाली. याशिवाय महान सचिन तेंडुलकरने 18 चेंडूत 25 धावांची खेळी केली. गुरकीरत सिंग मानने 14 धावा केल्या. युवराज सिंग १३ धावा करून नाबाद राहिला. स्टुअर्ट बिन्नीने 9 चेंडूत 16 धावांची जलद खेळी खेळली.
इंडिया मास्टर्स प्लेइंग इलेव्हन : सचिन तेंडुलकर (कर्णधार), अंबाती रायुडू (विकेटकीपर), पवन नेगी, युवराज सिंग, स्टुअर्ट बिन्नी, युसूफ पठाण, इरफान पठाण, गुरकीरत सिंग मान, विनय कुमार, शाहबाज नदीम आणि धवल कुलकर्णी.
वेस्ट इंडिज मास्टर्स प्लेइंग इलेव्हन : ब्रायन लारा (कॅप्टन), ड्वेन स्मिथ, विल्यम पर्किन्स, लेंडल सिमन्स, चाडविक वॉल्टन, दिनेश रामदिन (विकेटकीपर), अॅशले नर्स, टिनो बेस्ट, जेरोम टेलर, सुलेमान बेन आणि रवी रामपॉल.












Click it and Unblock the Notifications