Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ind vs pak भारताचा मोठा विजय, पाकला दाखवली औकात! अभिषेक-तिलक, सूर्या चमकले, वाचा सामन्याचे हायलाईट्स

India's victory over Pakistan : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कपमधील सामना भारताने जिंकला आहे. पाकिस्तानवर ७ गडी राखून भारताने हा विजय मिळवला. पाकिस्तानने दिलेले १२८ धावांचे आव्हान टीम इंडियाने सहज पार केले.

दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आज रात्री खेळल्या गेलेल्या सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कहर केला आणि पाकिस्तानची फलंदाजी चिरुन काढली. फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानी संघाला २० षटकांत ९ गडी गमावून १२७ धावाच करता आल्या. भारताततर्फे अभिषेक शर्माने स्फोटक फलंदाजी करत अवघ्या १३ चेंडूत ३१ धावा केल्या. त्यानंतर शुभमन गिल १० धावा काढून बाद झाला तर सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी अर्धशतकीय भागीदारी करत संघाला विजयासमीप नेले. तिलक वर्मा ३१ धावा काढून बाद झाला तर सूर्यकुमार यादवने ४७ धावा केल्या. तर शिवम दुबेने १० धावा केल्या.

India s victory over Pakistan

तत्पुर्वी पाकची फलंदाजी आज ढेपाळली. एकट्या साहिबजादा फरहानने ४० आणि शाहीन शाह आफ्रिदीने ३३ धावा केल्या. भारताकडून कुलदीप यादवने तीन विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेलने प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या.

नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजी स्वीकारली. तत्पुर्वी नाणेफक हरल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पाड्यांने आम्ही खूश आहोत खेळपट्टीशी जळवून घेऊ असे म्हटले होते. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी केली. गोलंदाजांसाठी उपयु्क्त खेळपट्टीवर अपेक्षेप्रमाणे गोलंदाजांच्या पारड्यात यश आले.

हेही वाचा : Ind vs Pak :कुलदीप यादवच्या गोलंदाजीने केली पाकच्या 3 फलंदाजांची शिकार! 13 व्या षटकात काय झालं? वाचा

सामन्यातील पहिल्या इनिंगचे हायलाईट्स..

  • हार्दिक पांड्याने पहिल्याच षटकात भारताला विकेट मिळवून दिली. हार्दिकने टाकलेला चेंडू आयूबने पाॅईंटच्या दिशेने खेळला. उडालेला झेल जसप्रित बुमराहने घेतला. सईम आयुब विना खाते उघडता तंबुत परतला.
  • त्यानंतर जसप्रित बुमराहने दुसऱ्या षटकात भारताला विकेट मिळवून दिली. मोहम्मद हारीस हार्दिक पंड्याच्या हाती झेल देऊन तंबूत गेला. हारिसने केवळ तीन धावा काढल्या.
  • त्यानंतर षटकाच्या चौथ्या षटकात फखर इमान जसप्रित बुमराहच्या यार्करचा बळी ठरला व पायचित झाला.
  • सामन्याच्या आठव्या षटकात अक्षर पटेल त्याचे पहिलेच षटक टाकले व त्याला यश मिळाले. त्याच्या गोलंदाजीवर फखर झेलबाद तिलक वर्माच्या हाती झेल देऊन बाद झाला. ही पाकिस्तानची तिसरी विकेट होती.
  • त्यानंतर सामन्याच्या दहाव्या षटकात आणि अक्षर पटेलच्या दुसऱ्या षटकात त्याला विकेट मिळाली. सलमान अली आगाला त्याने अभिषेक शर्माच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. अशा पद्धतीने अवघ्या ४७ धावांत पाकच्या ४ विकेट पडल्या.

कुलदीपची कमाल,हॅट्रीक हुकली!

  • सामन्याच्या १३ व्या षटकात कुलदीप यादवने सलग दोन चेंडूंवर विकेट घेतल्या. त्याने एक झेलही सोडला. या षटकात कुलदीपने फक्त ३ धावा दिल्या.
  • कुलदीपच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर, फॉलो-थ्रूमध्ये कुलदीपने हसन नवाजचा झेल सोडला. त्याने झेल घेण्याचा प्रयत्न कसोशीने केला पण झेल सुटलाच.
  • चौथ्या चेंडूवर, हसन नवाजने स्लॉग स्वीप केला, परंतु चेंडू हवेत गेला आणि अक्षर पटेलने झेल पकडला येथे पाकची पाचवी विकेट गेली. हसन फक्त ५ धावा करू शकला.
  • पाचवा चेंडू गुगली होता, जो मोहम्मद नवाजच्या पॅडवर लागला. फील्ड पंचांनी त्याला आउट दिल्यानंतर, फलंदाजाने रिव्ह्यू घेतला, परंतु तिसऱ्या पंचानेही मोहम्मद नवाजला बाद घोषित केले आणि तो खाते उघडू शकला नाही. ही पाकची सहावी विकेट होती.

कुलदीपने घेतली तिसरी शिकार पाकिस्तानने सातवा खेळाडू गमावला

  • १७ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कुलदीपने साहिबजादा फरहानला बाद केले. फरहानने ४४ चेंडूत ४० धावा केल्या. साहीबजादा फरहान हा धावपट्टीवर टिकून होता, त्याने ४० वी धाव काढली, त्यानंतर तो आऊट झाला.
  • १८ व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर वरुण चक्रवर्तीने फहीम अशरफला एलबीडब्ल्यू बाद केले. फहीमने १४ चेंडूत ११ धावा काढल्या.
  • १९ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने सुफियान मुकीमला बाद केले.
  • शाहीन आफ्रीदीने लगावले ४ षटकार!
  • ९ व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या शाहीन शाह आफ्रिदीने ४ षटकार मारत ३३ धावा केल्या आणि पाकिस्तानला २० षटकांत १२७ धावांपर्यंत पोहोचवले. अबरार अहमद त्याच्यासमोर नाबाद राहिला.

भारत पाॅईंट टेबलमध्ये अव्वलस्थानी

या विजयासह, भारत पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर कायम आहे आणि सुपर-४ मध्ये पोहोचण्याच्या संघाच्या शक्यताही वाढल्या आहेत. दुसरीकडे, जर पाकिस्तानला पुढील फेरीत प्रवेश करायचा असेल तर त्यांना युएईविरुद्धचा शेवटचा सामना जिंकावा लागेल.

हेही वाचा : Asia Cup Ind vs Pak पाकिस्तानचा खुर्दा! कुलदीपची हॅट्रीक हुकली, टीम इंडियाला 'एवढ्या' धावांचे आव्हान

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+