Ind vs Pak :कुलदीप यादवच्या गोलंदाजीने केली पाकच्या 3 फलंदाजांची शिकार! 13 व्या षटकात काय झालं? वाचा
Ind vs Pak Kuldeep Yadav misses hat-trick : भारत आणि पाकिस्तान सामन्यात भारतीय गोलंदाज कुलदीप यादवने धारदार गोलंदाजी केली. त्याला जसप्रित बुमराह आणि अक्षर पटेल, हार्दीक पांड्याने साथ दिली. कुलदीप यादवने आपल्या षटकात तिसऱ्या चेंडूवर एक झेलही सोडला मग मात्र त्याने मागे वळून पाहिले नाही आणि पाकचे दोन फलंदाज त्याच षटकात बाद केले.
कुलदीप यादवने युएईविरुद्धच्या सामन्यातही खास गोलंदाजी करत ४ गडी बाद केले होते. त्यानंतर त्याने आपल्या खास गोलंदाजीचे सातत्य पाकविरुद्धच्या आजच्या सामन्यातही कायम राखले.

नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजी स्वीकारली. पुर्वार्धात पाकिस्तानची स्थिती अत्यंत दयनीय झाली. १२ षटकात पाकिस्तानी संघ केवळ ४७ धावाच करु शकला. अवध्या ४७ धावांतच पाकचे ४ गडी तंबूत परतले होते. त्यानंतर पुढे खेळ कसाबसा पाक फलंदाजांनी पुढे नेला पण घसरगुंडी झाली ती झालीच. शेवटी पाकने ९ गडी गमावत १२७ धावा केल्या आणि भारतासमोर १२८ धावांचे आव्हान दिले. या सामन्यातील पुर्वार्धात कुलदीपने मोठी कमाल केली.
हेही वाचा : Asia Cup Ind vs Pak पाकिस्तानचा खुर्दा! कुलदीपची हॅट्रीक हुकली, टीम इंडियाला 'एवढ्या' धावांचे आव्हान
१३ व्या षटकात कुलदीप यादवची हॅट्रीक हुकली!
- तिसरा चेंडू - सामन्याच्या १३ व्या षटकात कुलदीप यादवने सलग दोन चेंडूंवर विकेट घेतल्या. त्याने एक झेलही सोडला. या षटकात कुलदीपने फक्त ३ धावा दिल्या.
- कुलदीपच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर, फॉलो-थ्रूमध्ये कुलदीपने हसन नवाजचा झेल सोडला. त्याने झेल घेण्याचा प्रयत्न कसोशीने केला पण झेल सुटलाच.
- चौथा चेंडू - चौथ्या चेंडूवर, हसन नवाजने स्लॉग स्वीप केला, परंतु चेंडू हवेत गेला आणि अक्षर पटेलने झेल पकडला येथे पाकची पाचवी विकेट गेली. हसन फक्त ५ धावा करू शकला.
- पाचवा चेंडू - कुलदीपचा पाचवा चेंडू गुगली होता, जो मोहम्मद नवाजच्या पॅडवर लागला. फील्ड पंचांनी त्याला आउट दिल्यानंतर, फलंदाजाने रिव्ह्यू घेतला, परंतु तिसऱ्या पंचानेही मोहम्मद नवाजला बाद घोषित केले आणि तो खाते उघडू शकला नाही. ही पाकची सहावी विकेट होती.
- १७ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर कुलदीपने साहिबजादा फरहानला बाद केले. फरहानने ४४ चेंडूत ४० धावा केल्या. साहीबजादा फरहान हा धावपट्टीवर टिकून होता, त्याने ४० वी धाव काढली, त्यानंतर तो आऊट झाला.
- कुलदीप यादवने चार षटकात १८ धावा दिल्या आणि ३ गडी बाद केले. त्याची सरासरी ४.५० एवढी होती.
- जसप्रित बुमराहने ४ षटकात २८ धावा देत २ गडी बाद केले.
- अक्षर पटेलने ४ षटकात १८ धावा देत २ गडी बाद केले.
- हार्दिक पांड्याने ३ षटकात ३४ धावा देत १ गड बाद केला.
- अभिषेक शर्माने एक षटक टाकले त्याला एकही विकेट मिळाली नाही त्याने धावा मात्र ५ दिल्या.












Click it and Unblock the Notifications