आफ्रिकेवर विजयानंतर आता 'किवीं'चे आव्हान! जाणून घ्या भारत-न्यूझीलंड मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक!
IND vs NZ ODI Schedule 2026 : भारतीय क्रिकेट संघ सध्या विजयाच्या रथावर स्वार आहे. दक्षिण आफ्रिकेला त्यांच्याच भूमीत एकदिवसीय मालिकेत २-१ असे पराभूत केल्यानंतर आणि टी-२० मालिकेतही आपले वर्चस्व सिद्ध केल्यानंतर, टीम इंडिया आता नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. २०२६ च्या सुरुवातीलाच भारतीय संघ मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध दोन हात करणार आहे. २०२७ च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीने ही मालिका भारतासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.

विजयाचा आत्मविश्वास आणि फॉर्मात असलेले दिग्गज
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत विराट कोहली विजयाचा खरा शिल्पकार ठरला. त्याने ३ सामन्यांत तब्बल ३०२ धावा कुटून आपला दबदबा कायम ठेवला आहे. त्याला कर्णधार रोहित शर्मा (१४६ धावा) याने मोलाची साथ दिली. याच आत्मविश्वासाच्या जोरावर भारतीय संघ आता न्यूझीलंडचा सामना करेल.
केएल राहुलकडे नेतृत्वाची धुरा?
या मालिकेसाठी अधिकृत संघाची घोषणा अद्याप झालेली नसली, तरी रोहित आणि विराट खेळणार हे निश्चित आहे. मात्र, सलामीवीर शुभमन गिल याच्या पायाच्या दुखापतीमुळे निवडीचा पेच निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत, यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुल याच्याकडे भारतीय संघाचे नेतृत्व सोपवले जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, न्यूझीलंड संघाची कमान अनुभवी मिशेल सँटनर सांभाळू शकतो.
भारत विरुद्ध न्यूझीलंड: एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक (ODI Schedule 2026)
ही मालिका भारतातील वडोदरा, राजकोट आणि इंदूर या शहरांमध्ये खेळवली जाणार आहे. सर्व सामने भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता सुरू होतील.
- सामना : तारीख : ठिकाण वेळ (IST)
- १ ला एकदिवसीय : ११ जानेवारी २०२६ (रविवार) : कोटांबी स्टेडियम, वडोदरा दुपारी १:३०
- २ रा एकदिवसीय : १४ जानेवारी २०२६ (बुधवार) :निरंजन शाह स्टेडियम, राजकोट दुपारी १:३०
- ३ रा एकदिवसीय : १८ जानेवारी २०२६ (रविवार) : होळकर स्टेडियम, इंदूर दुपारी १:३०
-
LPG Cylinder New Rule: गॅस सिलिंडर बुकिंगमध्ये बदल; ग्रामीण भागात आता 'इतक्या' दिवसांनी होणार बुकिंग -
लोकनेते यशवंतराव चव्हाण यांची आज जयंती; जाणून घ्या त्यांचे 5 ऐतिहासिक निर्णय; शेअर करा अभिवादन संदेश -
Epfo pension : 20 दिवस उलटूनही पेन्शन क्लेम होतोय रिजेक्ट? ही आहेत कारणे; वाचा ईपीएफओचा नवा नियम -
Gold Price Forecast: सोन्याच्या दरात मोठी उलथापालथ! 1 तोळा सोनं 2 लाखांचा टप्पा ओलांडणार? वाचा अंदाज -
सोनं झालं स्वस्त! युद्ध असूनही भावात मोठी घसरण का?; वाचा मुंबई, पुणे अन् नागपूरचे आजचे ताजे दर -
मनोरंजन विश्वावर शोककळा! अवघ्या 27व्या वर्षी प्रसिद्ध कलाकाराचा संशयास्पद मृत्यू -
ना पाणी, ना लिफ्ट; असुविधांचा डोंगर! म्हाडाच्या प्लॅटधारकांचा टाहो; रजिस्ट्रीची घाई पण सोयींची वाणवा -
Horoscope Today March 12, 2026 Marathi : गुरुवार ठरणार प्रगतीचा दिवस; वाचा तुमच्या राशीत काय आहे खास -
PM Kisan 22nd Installment आज कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात येणार 2 हजार रुपये; वेळ आणि स्टेटस तपासा -
IPL 2026 Schedule: आयपीएलचे 15 दिवसांचे वेळापत्रक समजून घ्या; पहिल्या सामना RCB Vs हैदराबाद -
इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्यांचा आक्रमक पवित्रा; मोजतबा खामेनी US-इस्रायलवर बरसले, होर्मुझ बंद.. -
ट्रम्प प्रशासन पुन्हा भारतावर टॅरिफ लादणार; प्रमुख व्यापारी भागीदारांविरुद्ध अमेरिकेची मोठी चौकशी!










Click it and Unblock the Notifications